बंदकडे कोणी लक्ष देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:25 PM2019-06-29T22:25:42+5:302019-06-29T22:26:30+5:30

व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे मोठे नुकसान

Who will pay attention to the band? | बंदकडे कोणी लक्ष देणार का?

बंदकडे कोणी लक्ष देणार का?

Next

विजयकुमार सैतवाल
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीची पाडलेली भिंत पुन्हा बांधून दिली जात नसल्याने व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे मोठे नुकसान होत असले तरी त्यावर तोडगा निघत नसल्याने या कडे कोणी लक्ष देईल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
परवानगी नसताना व्यापारी संकुलासाठी कृषी उत्त्पन्न बाजार समितीची तीनशे मीटर भिंत पाडण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. त्यानंतर भिंत बांधून देण्याचे आश्वासन मिळाल्याने व्यापाºयांनी बंद मागे घेतला. मात्र आश्वासनानुसार काम सुरू होत नसल्याने जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशनने पुन्हा १७ जूनपासून बेमुदत बंद पुकारला आहे़ आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने व्यापाºयांनी लोकप्रतिनीधींना निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी लागवण्याची मागणी केली. मात्र बंदला दोन आठवडे होत आले तरी तरी त्याकडे कानाडोळाच होत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. या प्रकरणात काही मोजक्या मंडळींसाठी शेकडो व्यापाºयांना वेठीस धरले जात असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. भिंत बांधून देण्याची मागणी असली तरी राजकीय दबावतंत्राचा वापर करून विकासकाला झुकते माप दिले जात असल्याचेही व्यापाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यापाºयांसह शेतकरीही वेठीस धरले जात असल्याचा सूर आहे. पुढे विधानसभा निवडणुका असल्याने व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ग्रामीण भागातील अधिकाधिक संचालक असल्याने त्यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी जात नसल्याचा आरोप केला जात आहे. या संचालकांच्या विरोधात भूमिका घेतल्यास निवडणुकीवेळी परिणाम होऊ शकतो, अशी भीती असल्याने निवडणुकांवर डोळा ठेवून काहीही हालचाली होत नसल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे सहकार खात्याशी निगडीत हा विषय असला तरी व सहकार राज्यमंत्रीही जिल्ह्यातीलच असले तरी तेच संचालक मंडळाचे नेते असल्याने संचालकांना ते नाराज करू शकत नसल्याचा सूर व्यापाºयांमध्ये आहे.
या बंदमुळे व्यापारी, शेतकरी यांच्यासह जळगावातील मोठा उद्योग असलेल्या दालमिललादेखील फटका आहे. त्यामुळे यावर तत्काळ तोडगा काढणे गरजेचे असल्याचा सूर आहे. या बंदमुळे धान्यासह कडधान्याचीही आवक बंद असल्याने त्याचा फटका दालमिलला बसू लागला आहे. स्थानिक पातळीवर कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील इतर बाजार समितींसह विदर्भातून कच्चा माल आणण्याची वेळ दालमिल चालकांवर आली आहे. विशेष म्हणजे हरभºयाच्या आयातीवर सरकारने पूर्णपणे बंदी घातलेली असल्याने त्याचा अधिक तुटवडा जाणवत आहे. माल खरेदी होत नसल्याने त्याचा परिणाम दालमिलवर होऊ लागला आहे. जळगावात ५० ते ५५ दालमिल असून येथे दररोज ७०० ते ८०० टन कच्चा माल लागतो. आधीच सरकारने एप्रिल महिन्यात कडधान्याच्या आयातीवर निर्बंध घातल्याने केवळ १५ टक्केच कच्चा माल विदेशात आयात करता येत आहे. हे प्रमाण कमी होण्यासह आता बाजार समितीमधील बंदमुळे स्थानिक पातळीवर माल उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. जळगावात माल उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील इतर बाजार समितीमधून कच्च्या मालाची खरेदी केली जात आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात माल उपलब्ध होत नसल्याने दालमिल चालकांना अकोला, अमरावती, खामगाव येथे धाव घेऊन तेथून कच्चा माल आणावा लागत आहे. यात प्रवास खर्च वाढल्याने दालमिल चालकांना भूर्दंड सहन करावा लागत आहे. कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने उत्पादनावरही थोडाफार परिणाम झाला आहे. इतर शहरांमधून कच्चामाल आणावा लागत असल्याने खर्च वाढला असला तरी मागणी नसल्याने डाळींचे भाव वाढविता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा भूर्दंड दालमिल चालकांनाच सहन करावा लागत आहे. जळगावातील उद्योगांची स्थिती बिकट असताना दालमिल कसेबसे सावरून उद्योग वाढीला हातभार लावत आहे. त्यात अशा प्रकारच्या बंदमुळे उद्योगांवर परिणाम होत असेल तर ते उद्योगांसाठी मारक असल्याने बंदसंदर्भात लोकप्रतिनिधी, अधिकाºयांनी लक्ष घालून उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे दालमिल चालकांचे म्हणणे आहे.

Web Title: Who will pay attention to the band?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव