एक हजाराची लाच घेताना धरणगाव पं.स.च्या अभियंत्याला अटक

By admin | Published: June 23, 2017 12:06 PM2017-06-23T12:06:38+5:302017-06-23T12:06:38+5:30

ग्रामसेविकेमार्फत स्वीकारली रक्कम

While taking a thousand bribe, the engineer of Dharangaon Pt | एक हजाराची लाच घेताना धरणगाव पं.स.च्या अभियंत्याला अटक

एक हजाराची लाच घेताना धरणगाव पं.स.च्या अभियंत्याला अटक

Next

 ऑनलाईन लोकमत 

जळगाव,दि.23 : कामाचा दर्जा ठरवून त्याची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेण्यासाठी महिला ग्रामसेवकाच्या माध्यमातून 1 हजाराची लाच स्वीकारताना धरणगाव पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता बाळासाहेब काशीनाथ सोनवणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी उपविभागीय अभियंता कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी चावलखेडा, ता.धरणगाव येथे 14 व्या वित्त आयोगातून पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम केले होते. या कामाचे एक लाख रुपये जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या खात्यात ऑनलाईन वर्ग केले होते. हे काम योग्य की अयोग्य याबाबत मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन त्यावर कनिष्ठ अभियंत्याची सही लागते.  
या कामासाठी तक्रारदाराने अभियंता सोनवणे याची धरणगाव पंचायत समितीला भेट घेतली असता त्याने ही नोंद घेण्यासाठी 5 टक्के प्रमाणे 5 हजाराची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदाराने 4 हजार रुपये आधी दिले होते. मात्र तरीही ही नोंद झालेली नव्हती. 1 हजार रुपये आणल्यावर ही नोंद करतो असे सोनवणे याने सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पराग सोनवणे यांची भेट घेऊन तक्रार केली. सोनवणे यांनी तक्रारीची पडताळणी करुन गुरुवारी उपविभागीय कार्यालयाजवळ सापळा लावला. सोनवणे बाहेर असल्याने ही रक्कम महिला ग्रामसेवक शीतल आनंदा पाटील यांच्याजवळ देण्याचे सांगितले. त्यामुळे शीतल पाटील यांनी ही रक्कम स्वत:जवळ घेतली नंतर त्यांच्याकडून ही रक्कम घेताना सोनवणे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

Web Title: While taking a thousand bribe, the engineer of Dharangaon Pt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.