पाणीपुरवठा सध्या तरी दोन दिवसाआडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:16 AM2019-02-02T11:16:49+5:302019-02-02T11:17:24+5:30

वाघूर धरणात पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा नसल्याने चिंता

Water supply is currently two days away | पाणीपुरवठा सध्या तरी दोन दिवसाआडच

पाणीपुरवठा सध्या तरी दोन दिवसाआडच

Next
ठळक मुद्देपुढे होणार तीन दिवसाआड पाणी पुरवठा


जळगाव : वाघूर धरणात पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा नसल्याने यंदा जळगावकरांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा हालचाली मनपा प्रशासनाच्या सुरु होत्या. मात्र, तीन दिवसाआड पाणी पुरवठा केल्यास नागरिकांना अडचणी येवू शकतात. तसेच लोकसभा निवडणूक देखील असल्याने याचा फटका बसू नये म्हणून सध्या आह, त्याच पध्दतीने पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी भूमिका मनपाच्या सत्ताधाऱ्यांनी घेतली असल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे जळगावकरांना लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हा निर्णय घेण्याआधी अजून एकवेळेस वाघूर धरणाच्या जलसाठ्याचा आढावा घेण्यात येणार आहे. वाघूर धरणात सध्या ३३ टक्के जलसाठा शिल्लक असून, पावसाळ्यापर्यंत हा जलसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. मात्र, वाघूर धरणातून सिंचनासाठी पाणी दिल्यास अडचण येवू शकते अशी माहिती अधिकाºयांनी दिली आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी देखील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी या प्रकरणी चर्चा करून शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठ्याचा हालचालींबाबत चर्चा केली होती. त्यावर गिरीश महाजन यांनी सुरेशदादा जैन यांना शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा होणार नाही, असे आश्वासन दिले होते. तसेच महाजन हे याबाबत आयुक्त डांगे व आमदार सुरेश भोळे यांच्याशी चर्चा करणार आहेत.

Web Title: Water supply is currently two days away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.