विठ्ठल भजावा, आलो देवाजीच्या गावा.. : जळगावची मुक्ताबाई राम पालखी पंढरपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:53 AM2019-07-12T11:53:33+5:302019-07-12T11:54:01+5:30

भाविकांचा अपूर्व उत्साह

Vitthal Bhajwa, Aad Dev Ji's village: Muktabai Ram Palkhi of Jalgaon, Pandharpur | विठ्ठल भजावा, आलो देवाजीच्या गावा.. : जळगावची मुक्ताबाई राम पालखी पंढरपुरात

विठ्ठल भजावा, आलो देवाजीच्या गावा.. : जळगावची मुक्ताबाई राम पालखी पंढरपुरात

Next

जळगाव : सावळ््या विठूरायाच्या भेटीची आस लागलेल्या शेकडो वारकरी, भाविकांसह जळगावातील संत मुक्ताबाई राम पालखी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला गुरुवार, ११ जुलै रोजी पंढरपुरात पोहचली. चार जिल्हे व १२ तालुक्यांमधून प्रवास करताना अभंग, भजनांच्या मधूर निनादामध्ये २४ दिवसात ही पालखी पंढरपुरात दाखल झाली.
जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा अर्थात जळगाव ते पंढरपूर वारीचे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी १७ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले होते.
सर्वात पुढे संत मुक्ताबाई राम पालखी
जळगाव येथून निघाल्यावर पालखी शिरसोली, वावडदा, दुसखेडे, लोहटार, कजगाव, रांजणगाव मंडवाडी, चापानेर, बोरगाव, खुलताबाद, तुर्काबाद, प्रवरासंगम, नेवासा, वडाळा, जेऊर, नगर, रुईछत्तीसी, मिरजगाव, करमाळा, मांगी, वांगी, टेंभुर्णी, करकंब, पवारवस्ती या मार्गाने २४ दिवस प्रवास करुन ही पालखी ११ जुलै रोजी दुपारी दोन वाजता चंद्रभागा नदीच्या पुलावर पोहचली. वाखरी येथे महाराष्ट्रातून येणाऱ्या विविध पालख्या एकत्र येतात. या सोहळ्यात मुक्ताबाईची पालखीदेखील सहभागी झाली. विशेष म्हणजे सर्वात पुढे मुक्ताबाईची पालखी होती. त्या मागे संत नामदेव महाराज व इतर पालख्या विठूरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाल्या.
संध्याकाळी मठात दाखल
दुपारी पुलावरून चंद्रभागेचे पात्र नजरेस पडताच वारकरी सुखावले व त्यानंतर ओढ लागली ती सावळ््या विठूरायाच्या दर्शनाची. चंद्रभागेचे पात्र ओलांडत श्री विठ्ठल, ज्ञानोबा, तुकाराम व मुक्ताबाईंच्या नामस्मरणात श्री क्षेत्र पंढरपूर येथे संध्याकाळी पालखीने प्रवेश केला. तेथे कासार घाटावरील श्री संत नामदेव मंदिराजवळ जळगावकर महाराजांचा वाडा येथे संध्याकाळी सात वाजता पालखी पोहचली.
....लागलीसे आस
संध्याकाळी मठात पालखी पोहचल्यानंतर दिंडीतील सर्वानाच आस लागली विठू माऊलीच्या भेटीची. सर्वांनी चंद्रभागेसह तिच्या तिरी उभा असलेल्या विठूरायाच्या मंदिराचे मनोहारी दृष्य आपल्या डोळ््यात साठवून घेत दर्शनासाठी मार्गस्थ झाले आणि आषाढी एकादशीची पहाट कधी येते आणि लाडक्या विठूरायाचे कधी दर्शन होते, अशीच सर्वांना आस लागली.
पाच दिवस मुक्काम
या ठिकाणी आता ५ दिवस मुक्कामास राहणार असून या ५ दिवसात दररोज चंद्रभागेचे स्नान, पंढरपूर नगर प्रदक्षिणा, श्री विठ्ठल दर्शन, भजन, भारुड, प्रवचन, कीर्तन, हरीजागर, श्री संत भानुदास महाराज पुण्यतिथी, श्री सद्गुरु मामासाहेब दांडेकर पुण्यतिथी, गोपाळकाला यासारख्ये अनेक कार्यक्रम होणार आहे.
केवळ जळगावातूनच रामरायाची मूर्ती
आषाढी वारीसाठी पंढरपूरला राज्यभरातून येणाºया विविध दिंड्यांपैकी केवळ जळगावातून जाणाºया वारीत रामरायाची मूर्ती असते. तसेच संत मुक्ताबाईची सर्वात जुनी पालखी जळगावातीलच आहे, हे विशेष.
पावसासह भक्तीरसात वारकरी चिंब
अप्पा महाराजांचे वंशज व विद्यमान गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी, श्रीराम महाराज जोशी यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे निघालेल्या या पालखी सोहळ्यामध्ये रोज काकडा भजन, श्री संत मुक्ताईंच्या पादुका व श्रीराम मूर्तीचे पूजन, भजन, भारुड, प्रवचन, कीर्तन, श्रीराम रक्षा स्त्रोत पठण, हरिपाठ, सामुदायिक जप असे कार्यक्रम झाले. दररोज होणाºया पावसासह पालखीतील या भक्तीरसातही वारकरी चिंब होत असे.
पालखी सोहळ््यात सहभागी झालेल्या भाविकांसाठी जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्यावतीने औषधी देण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे व इतर पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन दिलेल्या या औषधांचा वारकºयांना मोठा लाभ झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Vitthal Bhajwa, Aad Dev Ji's village: Muktabai Ram Palkhi of Jalgaon, Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव