पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे वृक्ष लागवड करून जवानांना अनोखी श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 03:34 PM2019-02-19T15:34:09+5:302019-02-19T15:35:25+5:30

सामनेर येथील सर्वोदय बहुउउद्देशिय संस्था व शिवकन्यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान स्मरणात रहावे व त्या बलिदानाची साक्ष म्हणून महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात वृक्ष लागवड करून अनोखी आदरांजली वाहिली.

Unique tribute to the jawans by planting trees at the cluster in Pachora taluka | पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे वृक्ष लागवड करून जवानांना अनोखी श्रद्धांजली

पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे वृक्ष लागवड करून जवानांना अनोखी श्रद्धांजली

Next
ठळक मुद्देसर्वोदय संस्था व शिवकन्यांचा असाही उपक्रमशिव जयंतीच्या पूर्वसंध्येला वृक्षांची लागवड करून त्यांना नाव दिले ‘शहिद वृक्ष’



सामनेर, ता.पाचोरा, जि.जळगाव : येथील सर्वोदय बहुउउद्देशिय संस्था व शिवकन्यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान स्मरणात रहावे व त्या बलिदानाची साक्ष म्हणून महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात वृक्ष लागवड करून अनोखी आदरांजली वाहिली.
वीर सुपुत्रांना व त्यांनी दाखविलेल्या शौर्याला ठिकठिकाणी मानवंदना देण्यात येत आहे. अशीच एक कायम स्मरणात राहील अशी मांवनदना सामनेर येथील सर्वोदय संस्था व महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिवकन्यांनी आपल्या विद्यालयाच्या प्रांगणात शिव जयंतीच्या पूर्वसंध्येला पुलवामा येथील शहीद जवानांना वृक्षांची लागवड करून त्यांना ‘शहिद वृक्ष’ असे नाव देऊन अनोखी श्रध्दांजली वाहिली.
लागवड केलेली सर्व झाडे जगवली जातील व या वीरांच्या बलिदानाची साक्ष ठरतील, अशी प्रतिक्रिया या शिवकन्या देत होत्या. आपल्यासाठी कायम उन्हाचे चटके सहन करणाऱ्या आपल्या जवानांच्या बलिदानाची साक्ष देणारी ही झाडे जवानांचे कायम स्मरण व विद्यार्थ्यामध्ये सदैव देशप्रेम जागृत करून जातील, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया शिक्षक वृंदांंनी दिली.
यावेळी विद्यालयाचे एस.बी.पाटील, जी.डी.पाटील, ठाकरे, नानुटे, भोसले व सर्वोदयचे रवींद्र पाटील, किरण पाटील, चंद्रकांत साळुंखे, अविनाश पाटील, अन्वर पठाण, चंदू पाटील, नरेंद्र पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते.

 

Web Title: Unique tribute to the jawans by planting trees at the cluster in Pachora taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.