मालवाहू वाहनाच्या धककेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:59 PM2019-03-26T22:59:09+5:302019-03-26T22:59:47+5:30

एक जण जखमी

Two wheelers killed by cargo | मालवाहू वाहनाच्या धककेत दुचाकीस्वार ठार

मालवाहू वाहनाच्या धककेत दुचाकीस्वार ठार

Next

पारोळा : भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने कैलास दिलीप चौधरी (४१, रा. बुरझड ता. जि. धुळे ) हे मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले. त्यांचामागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास आशिया महामार्गावर पारोळा शहरापासून दीड किमी अंतरावर सत्यनारायण मंदिरा जवळ झाला.
कैलास दिलीप चौधरी (४१) व अन्य एक जण मोटारसायकलने (क्रमांक एमएच १८, बीयू ०७३७) धुळेकडे जात असताना समोरून साहित्य घेऊन येणाऱ्या मालवाहू वाहनाने (एमएच ०४, बीयू ०५२४) जबर धडक दिली. त्यात मोटरसायकलचालक कैलास चौधरी हे जागीच ठार झाले तर त्यांच्या मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला. घटनास्थळा वरून रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर यांनी जखमीला पारोळा कुटीर रुग्णल्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉ. योगेश साळुंके डॉ. पारोचे यांनी उपचार केले.
अपघातानंतर मालवाहू वाहन पोलिसांनी पकडले असून चालकासही ताब्यात घेण्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Two wheelers killed by cargo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव