उंबरखेडला शिंदीची दोन हजार झाडे आगीत जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 03:22 PM2019-05-26T15:22:59+5:302019-05-26T15:29:06+5:30

अज्ञाताकडून घाला : केरसुणी तयार करणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ

Two thousand trees of Shrimshi were burnt to the ombrekhade | उंबरखेडला शिंदीची दोन हजार झाडे आगीत जळून खाक

उंबरखेडला शिंदीची दोन हजार झाडे आगीत जळून खाक

Next

उंबरखेड, ता.चाळीसगाव : केरसुण्या बनवून उदरनिर्वाह करणारी मातंग समाजाची येथे पंधरा-वीस कुटुंब आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवरच कोण्या अज्ञाताने घाला घातला व शिंदी वृक्षाची दोन हजार झाडे जाळून टाकली. या समाजाच्या उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची व रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील मातंग समाजातील कुटुंबांचा पिढीजात केरसुण्या बनवून, त्या विकून त्यावर उदरनिर्वाह करण्याचा परंपरागत व्यवसाय आहे. त्यामुळे या कुटुंबाने उंबरखेडे व दड पिंपरी शिवारातील कोरडी नाल्या काठावरील आपल्या शेतात व बांधावर चार-पाच हजार शिंदीची झाडे लावलेली आहेत. त्या झाडांचे फडे काढून केरसुण्या बनवतात व गावोगावी जाऊन विकून पैसे मिळतात.
२४ मे रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने या झाडांना आग लावून जाळल्याची घटना घडली आहे. या शेतात शेजारील शेतकरी साहेबराव कुंभार यांनी झाडे जळत असल्याचे संबंधितांना कळवले.
शिंदीची झाडे जळत असल्याचे समजताच एकनाथ महादेव शिरसाट, शरद रमेश शिरसाट, बंटी शिरसाट, विकी अहिरे, राकेश धनराज शिरसाट, प्रवीण त्रिभुवन, छोटू उखाजी शिरसाट आणि प्रत्यक्षदर्शी साहेबराव कुंभार यांनी जळत असलेली झाडे विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुपारचे कडक ऊन व वारा यामुळे आग पसरत गेली व दोन ते तीन हजार झाडे जळून खाक झाली आहेत.त्यांच्या पोटापाण्याचे साधनच नाहीसे झाल्याने सर्व कुटुंब आजच उघड्यावर पडली आहेत.
भाऊराव पंडित शिरसाट, महादू विठ्ठल शिरसाट, रमेश बंकट शिरसाट, उखाजी दामू शिरसाट, गोवा जी अप्पा शिरसाट यांच्या मालकीची ही सर्व झाडे होती.

कच्चा माल मिळण्यास अडचणी
शिंदी वृक्षाची झाडे जळाली.त्यामुळे शिंदीच्या झाडापासून केरसुणी तयार करणाºया कुटुंबांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. पुढील अनेक वर्षांचा व्यवसायासाठी लागणारा कच्चा मालच मिळणार नसल्याने त्यांची उपासमार ठरलेली आहे. महसूल प्रशासनाने पंचनामा करून संबंधित कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी या कुटुंबाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदीच्या झाडांना आग लावणाºया अज्ञाताचा शोध घेवून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी समाज बांधवांकडून करण्यात आली आहे.

Web Title: Two thousand trees of Shrimshi were burnt to the ombrekhade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.