मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी येथे मातीखाली दबल्याने दोन मजुर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:21 PM2018-02-26T15:21:06+5:302018-02-26T15:21:06+5:30

या घटनेत चिंतामण देवीदास म्हसाने (वय ३०) व दीपक दगडू म्हसाने (वय २२ दोघे रा. वरोली ता. जिल्हा बºहाणपूर) हे जागीच ठार झाले. मनोज गणेश सोनवणे (वय २०) व गजानन जाधव (वय २०) हे जखमी झाले आहेत

Two laborers killed in subdivision of Bhokari in Muktainagar taluka | मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी येथे मातीखाली दबल्याने दोन मजुर ठार

मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी येथे मातीखाली दबल्याने दोन मजुर ठार

Next
ठळक मुद्देमाती खोदकाम करणाºया मजुरांच्या अंगावर मातीची कराड कोसळली.तापी काठावरील मोठ्या प्रमाणात मातीच्या बरडातील सुपीक मातीचा शेती शिवारात होतो वापरया घटनेप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

आॅनलाईन लोकमत
मुक्ताईनगर, दि.२६ : तालुक्यातील भोकरी शिवारातील तापी काठावरील माती खोदकाम करणाºया मजुरांच्या अंगावर मातीची कराड कोसळल्याने माती खाली दबले जाऊन वारोली ता. जिल्हा बºहाणपूर येथील २ मजुर जागीच ठार झाले तर २ मजूर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास घडली

या घटनेत चिंतामण देवीदास म्हसाने (वय ३०) व दीपक दगडू म्हसाने (वय २२ दोघे रा. वरोली ता. जिल्हा बºहाणपूर) हे जागीच ठार झाले. मनोज गणेश सोनवणे (वय २०) व गजानन जाधव (वय २०) हे दोघर जखमी झाले आहेत
या भागातील तापी काठावरील मोठ्या प्रमाणात मातीच्या बरडातील सुपीक माती शेती शिवारात वापर केला जातो. भोकरी शिवारातील मातीच्या बरडातून माती खोदकाम करणाºया मजुरांनी सोमवारी पहाटे माती काढून ट्रॅक्टर भरला. शेवटच्या क्षणात घमेले फावडे उचलण्यास मजूर गेले असता अचानक मातीचे एक कराड त्यांच्या अंगावर पडली. यात माती खाली दाबले जाऊन दोघे जागीच ठार झाले तर अन्य दोघे जखमी झाले. जखमींवर मुक्ताईनगर उप जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. गजानन वासुदेव जाधव (रा. वरोली ता. जिल्हा बºहाणपूर) यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Two laborers killed in subdivision of Bhokari in Muktainagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.