अंतुर्ली येथे मोबाइल दुकान जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 02:52 PM2018-12-07T14:52:05+5:302018-12-07T14:53:38+5:30

अंतुर्ली पोलीस दूरक्षेत्रापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या आंबेडकर चौकातील मोबाइल दुकान जाळण्याचा प्रयत्न झाला. ही घटना दुुकानमालकास समजल्याने त्याने तत्काळ आग विजवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Trying to burn a mobile shop here at Antoori | अंतुर्ली येथे मोबाइल दुकान जाळण्याचा प्रयत्न

अंतुर्ली येथे मोबाइल दुकान जाळण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देदुकानमालकास समजल्याने धाव घेऊन तत्काळ विझवली आगपोलीस दूरक्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर घडली घटनारात्री पोलीस गस्त वाढवण्याची नागरिकांनी केली मागणी

अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : अंतुर्ली पोलीस दूरक्षेत्रापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या आंबेडकर चौकातील मोबाइल दुकान जाळण्याचा प्रयत्न झाला. ही घटना दुुकानमालकास समजल्याने त्याने तत्काळ आग विजवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. यात दुकानाच्या बाहेर ठेवलेला फलकादी किरकोळ सामान जळाला. यात एक ते दोन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना ६च्या मध्यरात्री घडली.
आंबेडकर चौकात नितीन सावकारे यांचे मोरया मोबाइल दुकान आहे. या मोबाइल दुकानाच्या बाहेरील भागाला अज्ञात समाजकंटकाने जाळण्याचा प्रयत्न केला. बाहेरील भाग जळत असल्याचे रस्त्याने जाणाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सावकारे यांना सांगितले. यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दुकानाकडे धाव घेऊन आग विजवली. परिणामी पुढील अनर्थ टळला. या घटनेची तक्रार पोलीद दूरक्षेत्र कार्यालयात देण्यात आली आहे. यापूर्वीही या परिसरात एक दुकान जाळण्यात आले होते, तर बºयाच वाहनांच्या बॅटºयाही चोरीला गेल्याच्या घटना ताज्या असताना दुकान जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Trying to burn a mobile shop here at Antoori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.