पारोळा रस्त्यावर माल वाहतूक टेम्पोच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:00 PM2018-09-12T23:00:33+5:302018-09-12T23:02:20+5:30

श्रीनाथजी नगातील रहिवाशी व तालुक्यातील नगाव येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक भागवत महादू पाटील (५२) व त्यांच्या पत्नी अलका भागवत पाटील (४५) यांचा दुचाकीला माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती- पत्नी जागीच ठार झाले.

Traffic on traffic on the Parola road killed a husband and wife on the spot | पारोळा रस्त्यावर माल वाहतूक टेम्पोच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार

पारोळा रस्त्यावर माल वाहतूक टेम्पोच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार

Next
ठळक मुद्देअपघातानंतर वाहनचालक पसारपारोळा तालुक्यातील चहुत्रे फाट्या जवळील घटनादोघे जण गेले होते कासोदा येथे साई बाबा दर्शनासाठी

पारोळा : श्रीनाथजी नगातील रहिवाशी व तालुक्यातील नगाव येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक भागवत महादू पाटील (५२) व त्यांच्या पत्नी अलका भागवत पाटील (४५) यांचा दुचाकीला माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती- पत्नी जागीच ठार झाले. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी १.३० वाजता घडली.
मुख्याध्यापक भागवत पाटील यांना दोन दिवस सुटी असल्याने आपल्या मूळ गावी मंगरुळ ता. पारोळा येथे गेले होते. बुधवारी हरितालिका असल्याने ते सकाळी पत्नी अलका यांना घेवून दुचाकीवरुन (क्र. एम.एच.१९- सी- एल-५८६८ वरुन कासोदा येथे साईबाबांचे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन घरी परतत असताना चहुत्रे ता. पारोळा या गावाच्या फाट्यावर समोरून पारोळ्याकडून कासोदाकडे जाणारा माल वाहतूक टेम्पो एम. एच.१९- सी.वाय- ०९३३ हा वेगाने जात असताना त्याने दुचाकीला जबरदस्त धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. यात पती-पत्नी जोरात खाली फेकले गेले. भागवत पाटील यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने कानातून रक्तस्राव सुरू झाला तर पत्नी अलका यांचा छातीला आणि पाठीला जबर मार लागल्याने त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.


टेम्पो इतक्या भरधाव वेगाने होता की, त्याची दिशाच अपघातात बदलली. प्रसंगी परिसरातील शेतकरी, शेतमजूर यांनी धाव घेत या दाम्पत्यांना उचलून रस्त्यावर आणले. टेम्पो चालकाला चांगला चोप दिला. मात्र गर्दीतून चालक फरार झाला. दाम्पत्यांला जबर मार लागल्याने त्यांनी जागीच जीव सोडला. पारोळा येथून डॉ. सुनील पारोचे हे घटनास्थळी तत्काळ हजर झाले. त्यांनी तपासून मृत घोषीत केला. अपघात स्थळा पासून मुख्याध्यापक भागवत पाटील यांचे गाव दीड - दोन कि.मी अंतरावर होते.घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती.एकाच वेळी अपघातात दाम्पत्यांच्या मृत्यूने आक्रोश करण्यात आला. शव पारोळा कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. या वेळी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी या ठिकाणी धाव घेत कुटुंबियांना धीर दिला. जितेंद्र पवार, सचिन पाटील,सुनील जाधव, देविदास सोनवणे, संदीप पाटील, गुणवंत पाटील, सुभाष निळ, यांच्यासह अनेक शिक्षक धावून आले.वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंके यांनी शवविच्छेदन केले. मुख्याध्यापक भागवत पाटील यांच्या पच्यात दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.रात्री पती- पत्नीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रत्यक्ष दर्शनी सांगतात
पारोळ्याकडून कासोद्याकडे जाणारा टेम्पो हा भरधाव होता. कुरकुरे, व्हेपर्स व इतर साहित्याने भरलेला होता. चालक सह चालकाच्या जागेवर बसून एका अल्पवयीन मुलाला वाहन शिकवीत होता. यातच वाहनावरील त्याचे नियंत्रण सुटले व समोरून येणाºया मोटारसायकलवर जाऊन टेम्पो आदळली. दाम्पत्यांची काही एक चुकी नसतांना त्यांना जीव गमवावा लागला.पारोळा पोलीस ठाण्यात ईश्वर महादू पाटील यांचा फिर्यार्दी वरून टेम्पो चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.
 

Web Title: Traffic on traffic on the Parola road killed a husband and wife on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.