लग्नातील शिळ्या अन्नाच्या विषबाधेने तीन शेळ्या व तीन मेंढ्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 06:03 PM2019-05-05T18:03:06+5:302019-05-05T18:04:23+5:30

रावेर तालुक्यातील विवरे बुद्रूक शिवारात शेतात पडलेले लग्नाच्या पंक्तीतील शिळे अन्न खावून विषबाधा झाल्याने तीन मेंढ्या व तीन शेळ्या असे सुमारे ५० ते ५५ हजार रुपये किमतीचे पशुधन दगावले. ही घटना रविवारी दुपारी दोनला घडली.

Three goats and three sheep have died due to the poisoning of food poisoning | लग्नातील शिळ्या अन्नाच्या विषबाधेने तीन शेळ्या व तीन मेंढ्या दगावल्या

लग्नातील शिळ्या अन्नाच्या विषबाधेने तीन शेळ्या व तीन मेंढ्या दगावल्या

Next
ठळक मुद्देविवरे बुद्रूक शिवारातील घटनापशुधन विकास अधिकाऱ्यांच्या पथकाने तातडीने औषधोपचार केल्याने ८० शेळ्या सुदैवाने बचावल्यासुमारे ५० ते ६० हजार रुपये नुकसान झाल्याचा अंदाज

रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील विवरे बुद्रूक शिवारात शेतात पडलेले लग्नाच्या पंक्तीतील शिळे अन्न खावून विषबाधा झाल्याने तीन मेंढ्या व तीन शेळ्या असे सुमारे ५० ते ५५ हजार रुपये किमतीचे पशुधन दगावले. ही घटना रविवारी दुपारी दोनला घडली. दरम्यान, पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या पथकाने तातडीने धाव घेऊन औषधोपचार केल्याने सुमारे ८० ते ९० शेळ्या व मेंढ्यांचे प्राण बचावले. त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विवरे बुद्रूक शिवारात पशुधन जंगल चराईसाठी वाडे घेऊन बसलेल्या हिरामण चिंधा कोळपे यांचा शेळ्या-मेंढ्यांंचा कळप रविवारी दुपारी विवरे-उटखेडा रस्त्यालगतच्या विवरे शिवारात जंगल चराईसाठी भटकंती करीत होता. तेव्हा एका शेतात पडलेले लग्न समारंभातील शिळे अन्न-पदार्थ खाण्यात आल्याने शंभर ते सव्वाशे शेळ्या व मेंढ्यांना विषबाधा झाली.
या विषबाधेने तत्क्षणी तीन मेंढ्या व तीन शेळ्या जागीच दगावल्याने मेंढपाळ हिरामण चिंधा कोळपे (रा.मुंजलवाडी, ता.रावेर) यांनी धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप सावळे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा पं.स.सदस्य धनश्री सावळे, संदीप सावळे, हरलाल कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पशुधन विस्तार अधिकाºयांशी संपर्क साधून तातडीची वैद्यकीय यंत्रणा पाचारण करून पशुधन पालकांचे सांत्वन केले.
पशुवैद्यकीय पथकातील पशुधन विकास अधिकारी डॉ.संजय धांडे (खिरोदा प्र.यावल), डॉ.प्रवीण धांडे (तांदलवाडी), डॉ.नीलेश राजपूत (सावदा) व शिपाई लक्ष्मण चौधरी यांनी तातडीने उर्वरित ८० ते ९० शेळ्या मेंढ्यांवर औषधोपचार केल्याने सुदैवाने मोठी जीवित हानी टळली आहे. औषधोपचार केलेल्या पशुधनाची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित पशुधन पालकांचे सुमारे ५० ते ६० हजार रुपये नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी महसूल यंत्रणा उशिरापर्यंत दाखल न झाल्याने पंचनाम्याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
 

Web Title: Three goats and three sheep have died due to the poisoning of food poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.