यावल तालुक्यातील तीन मित्रांचा तापी नदीत बुडून मृत्यू, गुजरातमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 01:00 PM2018-03-03T13:00:16+5:302018-03-03T13:00:16+5:30

गावावर शोककळा

Three friends of Yaval taluka drown in Tapi River and die, Gujarat incident | यावल तालुक्यातील तीन मित्रांचा तापी नदीत बुडून मृत्यू, गुजरातमधील घटना

यावल तालुक्यातील तीन मित्रांचा तापी नदीत बुडून मृत्यू, गुजरातमधील घटना

Next
ठळक मुद्देगावात चुलीच पेटल्या नाहीतनातेवाईकासह अनेकांनी फोडला हंबरडा

आॅनलाईन लोकमत
यावल, जि. जळगाव, दि.२ - यावल तालुक्यातील गिरडगाव येथील दोन तर किनगाव येथील एका युवकाचा अशा तीन जणांचा गुजरातमधील बारडोली येथील तापी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. दोन्ही लगतच्या गावातील युवकांच्या मृत्यूचे वृत्त किनगाव व गिरडगावात समजताच गावावर शोककळा पसरलीे. शुक्रवारी सायंकाळी घटनेचे वृत्त कळल्यानंतर सायंकाळच्या गावात चुलीच पेटल्या नाहीत. संपूर्ण गाव रात्रभर जागे होते. शनिवारी सकाळी मृतदेह गावात पोहचले असून त्यांच्यावर शोकाकुल वातावणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, गिरडगाव येथील शशीकांत मोतीलाल पाटील (वय २६ ) यांच्या बारडोली येथील साडूच्या मुलीच्या लग्नासाठी गुरूवारी गिरडगाव येथून पत्नी व दोन वर्षीय मुलासह गेले होते. शुक्रवारी त्या लग्नाची हळद तर शनिवारी लग्न होते. गावातील डिगंबर पुंडलीक पाटील ( वय २३ ) आणि किनगाव येथील श्रीराम संतोष पाटील (वय २३ ) हे शशीकांत यांचे दोघे मित्र बारडोली येथे नोकरीस आहेत. हळदिच्या कार्यक्रमांनतर तिघे मित्र शुक्रवारी बारडोली येथील तापी नदी जवळील खंडेश्वर मंदिराचे दर्शनासाठी गेले होते. त्या वेळी लगतच्या तापी नदीत आंघोळीस गेले असता त्यांचा एकमेकांना वाचविताना मृत्यू झाला.
डिगंबर आणि श्रीराम मामेभाऊ-आतेभाऊ
गिरडगावचा डिगंबर पाटील आणि किनगाव येथील श्रीराम पाटील हे दोघे मामेभाऊ-आतेभाऊ आहेत. तर शशीकांत आणि डीगंबर यांचे गिरडगावात समोरासमोर घर असून हे तीनही बालपणीचे मित्र आहेत.
गिरडगावात दोघे मित्रांची एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली तेव्हा नातेवाईकासह अनेकांनी हंबरडा फोडला.

 

Web Title: Three friends of Yaval taluka drown in Tapi River and die, Gujarat incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.