नशिराबाद महामार्गावर लूटप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:57 PM2018-06-20T12:57:15+5:302018-06-20T12:57:15+5:30

९ हजार रुपये लूट

Three arrested for robbing a Nashik Road highway | नशिराबाद महामार्गावर लूटप्रकरणी तिघांना अटक

नशिराबाद महामार्गावर लूटप्रकरणी तिघांना अटक

Next

नशिराबाद, जि. जळगाव : महामार्गावर रविवारी ट्रक अडवून रोख रक्कमेसह मोबाईल असा ९ हजार रुपये लूट करणाऱ्या विशाल विक्रम भोई (वय १८, रा.वाल्मीकनगर, जळगाव), प्रद्युम्न उर्फ बंटी नंदू महाले (वय १९, रा.शनिपेठ, जळगाव) व संदीप उर्फ गोलु जयसिंग सोनवणे यांना नशिराबाद पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.
नाशिक कळवण येथून भुवनेश्वर ओरिसा येथे कांद्याचा माल भरून नेणाºया ट्रक (सी.जी. ०७, बी.जी. ६३००) समोर तिघांनी रिक्षा आडवी करून ट्रक चालक व क्लीनर जवळील १ हजार रोख व ८ हजाराचा मोबाईल घेऊन पोबारा केला. ट्रक चालक परविंदरसिंग सुखदेवसिंग (४७, रा.भिलाई छत्तीसगड) यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल होता.
रिक्षावर त्रिदेव असे नाव होते असे सांगितल्यावर पोलिसांनी तपास चक्रे फिरविली. सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे, उपनिरीक्षक अशोक खरात, युनूस शेख, रामकृष्ण पाटील, राजेंद्र साळुंखे, गुलाब माळी, चेतन पाटील, हेमंत मेटकरे यांनी तिघांना अटक केली असून त्यांनी चोरीची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे व सहकारी तपास करीत आहेत.

Web Title: Three arrested for robbing a Nashik Road highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.