जामनेर तालुक्यातील ढालगाव येथे शिक्षक नसल्याने शाळा भरली पंचायत समिती परिसरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:49 PM2019-06-18T12:49:19+5:302019-06-18T12:49:37+5:30

शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांवर माघारी परतण्याची वेळ

Since there is no teacher at Dhalgaon | जामनेर तालुक्यातील ढालगाव येथे शिक्षक नसल्याने शाळा भरली पंचायत समिती परिसरात

जामनेर तालुक्यातील ढालगाव येथे शिक्षक नसल्याने शाळा भरली पंचायत समिती परिसरात

Next

जामनेर, जि. जळगाव : शाळेच्या पहिल्यात दिवशी शाळेत शिक्षक नसल्याने माघारी परतण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. जामनेर तालुक्यातील ढालगाव येथील उर्दू शाळेत घडलेल्या या प्रकारानंतर मंगळवारी विद्यार्थी जामनेर पंचायत समितीमध्ये पोहचले व त्यांनी तेथेच शाळा भरविली.
जामनेर तालुक्यातील ढालगाव येथील उर्दू शाळेतील शिक्षकांच्या आॅनलाईन बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर पर्यायी शिक्षक हजर झाले नाही. परिणामी १७ जूनला पहिल्या दिवशी शाळा उघडलीच नाही. त्यामुळे विद्यार्थी घरी परतले. या प्रकारामुळे संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांसह मंगळवार, १८ जून रोजी सकाळी जामनेरला येऊन पंचायत समिती कार्यालयात आवारातच शाळा भरविली. विद्यार्थी दप्तरासह जमिनीवर बसल्याने रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्यांची गर्दी झाली. गटशिक्षणाधिकारी आदिनाथ वाडकर यांनी तेथे भेट दिली.

Web Title: Since there is no teacher at Dhalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.