अमळनेर येथे शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 01:00 PM2018-03-04T13:00:27+5:302018-03-04T13:00:27+5:30

हॉस्पिटलच्या बाहेर मृतावस्थेत

Suspicious death of teacher | अमळनेर येथे शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू

अमळनेर येथे शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू

Next
ठळक मुद्देमोटारसायकल गायबमृत्यू संशयास्पद असल्याचा प्राथमिक अंदाज

आॅनलाइन लोकमत
अमळनेर, जळगाव, दि. ४ - जययोगेश्वर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक दीपक देवराम पाटील यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना 4 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली.
दीपक देवराम पाटील हे 4 रोजी पहाटे डॉ. हजारे अक्सिडंट हॉस्पिटलच्या बाहेर मृतावस्थेत पडलेले आढळून आले. पोलिसांनी रात्री त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, पायांवर मार लागलेला होता. प्राथमिक स्वरूपात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे
दीपक पाटील हे रात्री आपल्या मुलीला मोटारसायकल शिकवत होते त्यानंतर त्यांनी धोबीला पैसे देऊन सकाळी लग्नाला जायचे असल्याने इस्तेरीचे कपडे आणले. त्यानंतर 10 वाजेच्या सुमारास त्यांना कोणाचा तरी फोन आल्याने ते बाहेर गेले. मात्र रात्री उशिरा पर्यंत परतले नाहीत. त्यांच्या पत्नीने फोन लावला असता बंद आढळून आला. नातेवाईकाच्या सांगण्यानुसार रात्री दीड वाजता दीपक हजारे अक्सिडंट हॉस्पिटल समोर डॉक्टरांना बोलव माझा अपघात झाला आहे असे सांगत होता मात्र डॉ. नसल्याने दीपक तेथेच पडून राहीले. सुमारे सव्वा दोन वाजेच्या सुमारास डीवायएसपी गिरीश पाटील यांच्या भावजयने त्यांना सांगितले की कोणीतरी माणसाच्या पायाला कुत्रे ओढत आहेत. तेव्हा गिरीश पाटील यांनी पोलिसांन बोलावले. रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांनी मयत दीपक यांना रुग्णालायत दाखल केले. वैद्यकीय अधिकारी प्रकाश ताडे यांनी शवविच्छेदन केले. दीपक यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून व्हिसेरा राखून ठेवला आहे. त्यांची मोटारसायकल गायब असून भ्रमणध्वनीच्या सीडीआरवरून प्रकरण उघडकीस येईल, असे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी सांगितले.

Web Title: Suspicious death of teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.