अनाथांच्या उन्हाळी सुट्या चार भिंतीच्या आड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:18 PM2019-05-26T12:18:59+5:302019-05-26T12:20:31+5:30

जिल्हा बालनिरीक्षण गृह

The summer holidays of orphans | अनाथांच्या उन्हाळी सुट्या चार भिंतीच्या आड

अनाथांच्या उन्हाळी सुट्या चार भिंतीच्या आड

Next

सचिन देव
जळगाव : आई-बापाच छत्र हरपल्याने आणि नातलगानींही दूर केल्यामुळे अनाथ मुला-मुलींचे आयुुष्य इतर मुलांपेक्षा वेगळेच असते. जन्मदातेच ठिकाणावर नसल्यामुळे बालपणापासून जिल्हा बालनिरीक्षण गृहात दाखल असलेल्या अनाथांना उन्हाळ््याच्या सुट्टयासह इतर वर्षांतल्या कुठल्याही सुट्टया निरीक्षण गृहाच्या चार भिंतीत घालवाव्या लागतात. यामुळे त्यांच्यात नैराय येऊ शकते हे लक्षात घेऊन या मुलांना उन्हाळी सुट्यांमध्ये विरंगुळा म्हणून प्रशासनातर्फे विविध वस्तू तयार करण्याचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत आहे.
कुठल्या ना कुठल्या कारणात्सव आई-वडिलांचे निधन झालेले असणे व बेवारस आढळून आलेल्या बालकांना पोलिसांमार्फत बालनिरीक्षण गृहात आणले जाते. या ठिकाणी मुलांच्या संगोपनापासून ते शिक्षणापर्यंतची सर्व जबाबदारी जिल्हा बालनिरीक्षण गृहातर्फे पार पाडली जाते. त्यानुसार जळगावातील बालनिरीक्षण गृहात सध्या ४० मुले व ४५ मुली आहेत. ही सर्व मुले १८ वयोगटातील असून, शहारातील विविध शाळांमध्ये या मुलांचे शिक्षण सुरु आहे. निरीक्षण गृहाच्या अधिक्षिका म्हणून जयश्री पाटील काम पाहतात तर बाल हक्क संरक्षण समितीचे सदस्यही मुलांच्या संगोपनाकडे लक्ष देऊन असतात.
व्यावसायिक प्रशिक्षणात रमली मुले
ना जन्मदाते ना हक्काचे घर... परिणामी या मुलांना बाराही महिने बाल गृहातच रहावे लागते. त्यामुळे या मुलांचे मन कशात तरी रमावे, त्यांना आई-वडिलांची आठवण येऊ नये, यासाठी बाल निरीक्षण गृह प्रशासनातर्फे दरवर्षी उन्हाळी सुट्यांमध्ये या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये मोबाईल दुरूस्ती, घड्याळ दुरुस्ती, गणपती मूर्ती बनविणे, कापडी बॅगा तयार करणे आदी प्रशिक्षण दिले जाते. तर मुलींसाठी शिवणकाम, ब्युटीपार्लर व विविध कलाकृतीच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणात मुलांचा वेळ जात असून, त्यांचे मनही रमत आहे. तसेच विविध संस्थाच्या माध्यमातून मुलांना एमएस सीआयटी व इंग्रजी कोंचीग क्लासच्या माध्यमातुन इंग्रंजी शिकवले जात आहे. या व्यक्तीरिक्त मनोरंजनासाठी गायन स्पर्धा, वादन स्पर्धा, क्रिकेट आदी स्पर्धा घेतल्या जातात.
मोजकेच नातेवाईक येतात भेटायला
या ठिकाणी असलेल्या बालनिरीक्षणत आई-वडिल नसल्यामुळे पोलिसांमार्फत नातलगांनी दाखल केलेले आणि पोलिसांनींच कुठल्या ना कुठल्या कारणात्सव दाखल केलेल्या मुला-मुलींचा समावेश आहे. या मुलांमध्ये काही बोटावर मोजण्याइतकेच बालकांचे मामा-मावशी व इतर नातलग वर्षांतून कधी-तरी भेटायला येत असतात. विशेष म्हणजे यामध्ये जवळचे नातलंग दिवाळीच्या किंवा उन्हाळ््याच्या सुट्टीत जिल्हा बालनिरीक्षण गृहाच्या परवानगीने घरी आठ ते दहा दिवस घरी घेऊन जात असतात. मात्र, बहुतांश बालकांच्या नातलगांनी रक्ताच्या नात्यालाही विसरुन, दुर्लक्ष केले असल्याचे लक्षात येते.
बालनिरीक्षण गृहातील मुलांना उन्हाळी सुट्यांमध्ये कशात तरी मन रमावे, यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. मनोरंजनासाठी गायन-वादन व अंताक्षरीच्या स्पर्धाही घेतल्या जातात. तसेच या मुलांची दोन ते तीन दिवसांची सहल काढली जाते. पुढच्या आठवड्यात शिर्डी किंवा शेगावला सहल नेण्याचे नियोजन आहे.
-जयश्री पाटील, अधीक्षिका, बालनिरीक्षण गृह

Web Title: The summer holidays of orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव