वीजपुरवठा खंडीत केल्याच्या निषेर्धात चोपडा येथे शेतक-यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:32 PM2017-12-17T13:32:32+5:302017-12-17T13:33:42+5:30

अंकलेश्वर ब-हाणपूर महामार्ग ठप्प

Stop the way of the farmer at Chopda | वीजपुरवठा खंडीत केल्याच्या निषेर्धात चोपडा येथे शेतक-यांचा रास्ता रोको

वीजपुरवठा खंडीत केल्याच्या निषेर्धात चोपडा येथे शेतक-यांचा रास्ता रोको

Next
ठळक मुद्देपूर्व सूचना न देता शेती पंपांचा वीजपुरवठा खंडितलेखी आश्वासन मिळत नाही तोंपयर्ंत रास्ता रोको सुरूच राहील

ऑनलाईन लोकमत

चोपडा, जि. जळगाव, दि. 17-  तालुक्यात शेतक-यांना कोणतीही पूर्व सूचना न देता शेती पंपांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे तो पूर्ववत सुरू करावा यासाठी तालुका शेतकरी कृती समिती व विविध शेतकरी संघटनांनी अंकलेश्वर ब-हाणपूर महामार्गावर 17 रोजी सकाळी 11 वाजेपासून रास्ता रोको आंदोलन केले आहे. यावेळी महावितरणच्या अधिका-यांकडून शेतक-यांचा वीजपुरवठा खंडीत करणार नाही असे लेखी आश्वासन मिळत नाही तोंपयर्ंत रास्ता रोको सुरूच राहील असा पवित्रा शेतक-यांनी घेतला असल्याने दुपाररी 1 वाजेपयर्ंत रास्तारोको आंदोलन सुरू होते. यात सुकाणू समितीचे सदस्य एस. बी. पाटील,  शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे,  डॉ रवींद्र निकम, उदय पाटील, नितीन निकम, वजाहत अली काझी यांचे भाषणे झाली तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष अॅड. संदीप पाटील , माजी आमदार कैलास पाटील , भाजपाचे प्रकाश पाटील, अॅड. एस. बी. सोनवणे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी शासनाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या मार्गावरीसल वाहतूक ठप्प झाली. शासनाच्या वतीने नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर तर महावितरणचे उपविभागीय अधिकारी व्ही. बी. सोनवणे चर्चेसाठी आले. 

Web Title: Stop the way of the farmer at Chopda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.