लालगोट्यातील म्हंबाई मंदिरात चोरी

By admin | Published: April 12, 2017 12:31 AM2017-04-12T00:31:45+5:302017-04-12T00:31:45+5:30

कुºहा(काकोडा),ता.मुक्ताईनगर : लालगोटा येथील आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या म्हंबाई देवीच्या मंदिरात पहाटेच्या वेळी चोरांनी चोरी

Stolen in Mhambai temple in Lalgot | लालगोट्यातील म्हंबाई मंदिरात चोरी

लालगोट्यातील म्हंबाई मंदिरात चोरी

Next


कुºहा(काकोडा),ता.मुक्ताईनगर : लालगोटा येथील आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या म्हंबाई देवीच्या मंदिरात पहाटेच्या वेळी चोरांनी चोरी करून देवीची चांदीची मूर्ती चोरून नेली. तर विरोध करणाºया महिलेस मारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याची पानेसुद्धा हिसकावून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
लालगोटा या आदिवासी गावात अलकाबाई जोगींदर भोसले यांनी म्हंबाई देवीचे मंदिर बांधले आहे. त्यात म्हंबाई देवीसह इतर देवतांच्या मूर्ती स्थापित केलेल्या आहेत. या मंदिरात आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास मदापुरी ता.मुक्ताईनगर येथील काही इसमांनी चोरी करून देवीची मूर्ती चोरून नेल्याची तक्रार अलकाबाई भोसले यांनी पोलिसात दिली आहे. तक्रार  अर्जानुसार मदापुरी येथील राजेश भोसले, मंगलराज राजेश भोसले, गुड्डू पवार, अरविंदन राजेश भोसले, खबीना राजेश भोसले व धनश्री गुड्डू पवार यांनी मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास लालगोटा येथे येऊन मंदिरात प्रवेश केला व देवीची मूर्ती चोरणार, तोच बबुआ प्रताप भोसले याने त्यांना पाहिले व आरडाओरड केल्यामुळे गावकरी जागे होऊन  त्यांनी चोरांचा पाठलाग केला.
पळ काढताना दुचाकी घसरून त्यावरील एका महिलेस दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी अलकाबाई भोसले यांनी मुक्ताईनगरचे डीवायएसपी समीर शेख, पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्याशी फोनवर संपर्क साधून माहिती दिली. शिवाय सहायक पोलीस निरीक्षक हेमंत कडुकार यांना भेटून चोरट्यांवर कारवाई करून मूर्ती परत मिळविण्याची मागणी केली आहे. याबाबत पोलिसात अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती देण्यात आली.  (वार्ताहर)
झटापटीत पोत लंपास
 या वेळी झालेल्या झटापटीमध्ये चोरट्यांनी अलकाबाई भोसले यांच्या गळ्यातील सोन्याची पोतही लांबवली. तसेच गावकºयांवर दगडफेक करून दोन दुचाकींनी पळ काढला.

Web Title: Stolen in Mhambai temple in Lalgot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.