एस.टी. बसचा प्रवास महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:45 PM2018-06-16T12:45:13+5:302018-06-16T12:45:13+5:30

भाड्यामध्ये तब्बल १८ टक्कयांनी वाढ

S.T. Bus journey expensive | एस.टी. बसचा प्रवास महागला

एस.टी. बसचा प्रवास महागला

Next

जळगाव : शहरापासून ते ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणाºया एस. टी. बसचा प्रवास शुक्रवारी मध्यरात्रीपासून महाग झाला आहे. प्रवास भाड्यामध्ये तब्बल १८ टक्कयांनी वाढ झाली आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ही दरवाढ लागू होत आहे.आहे. नव्या दरानुसार जळगाव स्थानकावरुन पुण्याला जाण्यासाठी ४२२ रुपयांवरुन ५०० रुपये तिकीट लागणार आहे. तर स्लीपर शिवशाहीने पुण्याला जाणाºया प्रवाशांना ९०५ रुपयांवरुन एक हजार ७० रुपये मोजावे लागणार आहेत. तर विना स्लीपर शिवशाहीने पुण्याला जाण्यासाठी ६२९ वरुन ७४० रुपये मोजावे लागणार आहे.
दरम्यान जळगाव स्थानकावरुन सर्वांधिक प्रवाशांची संख्या धुळे, चाळीसगाव,औरंगाबाद या मार्गावर असल्याने या ठिकाणच्या भाड्यामध्ये २५ ते ३० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. आकारण्यात येणारे भाडे हे पूर्णांकात असल्याने, सुट्टया पैशांचा वाद मिटण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे तिकीट भाडे आकारणी ५ रुपयांच्या पटीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, ७ रुपये तिकीट असेल तर ते भाडे ५ रुपये असणार आहे. तर ज्या ठिकाणचे भाडे ८ रुपये असेल तर प्रवाशांना नव्या दरानुसार दहा रुपये मोजावे लागणार आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महामंडळाने चार वर्षानंतर ही भाडेवाढ लागू केली आहे. आज मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ एसटी प्रमाणेच शिवशाहीलाही लागू होईल.
-राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, जळगाव आगार

Web Title: S.T. Bus journey expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.