भाजपाची सत्ता असूनही जळगावात चौपदरीकरणचे घोंगडे भिजत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 02:30 PM2018-07-13T14:30:33+5:302018-07-13T14:34:53+5:30

केंद्रात व राज्यात सत्ता. जिल्ह्यात २ खासदार, ९ आमदार तसेच २ मंत्री असलेल्या भाजपाकडून शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या समांतर रस्त्यांचा तसेच महामार्ग चौपदरीकरणाचा विषय मार्गी लागू शकलेला नाही.

In spite of BJP's power, four-len road were burnt in Jalgaon | भाजपाची सत्ता असूनही जळगावात चौपदरीकरणचे घोंगडे भिजत

भाजपाची सत्ता असूनही जळगावात चौपदरीकरणचे घोंगडे भिजत

Next
ठळक मुद्देकेंद्र व राज्य शासनाने चार वर्षापासून दुर्लक्षजळगाव मनपात मात्र विकासाचे वायदे२ खासदार, ९ आमदार, ३ मंत्री असतानाही समस्या कायम

जळगाव : केंद्रात व राज्यात सत्ता. जिल्ह्यात २ खासदार, ९ आमदार तसेच २ मंत्री असलेल्या भाजपाकडून शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या समांतर रस्त्यांचा तसेच महामार्ग चौपदरीकरणाचा विषय मार्गी लागू शकलेला नाही. तरसोद ते फागणे चौपदरीकरण मक्तेदाराकडे निधी नसल्याने ठप्प झाले आहे. तर जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे तात्विक मंजुरी मिळालेले चौपदरीकरण अंतिम मंजुरीअभावी रखडले आहे. मात्र मनपा निवडणुकीत भाजपाला एक हाती सत्ता मिळाली तर विकास करून दाखविण्याचे गाजर मतदारांना दाखविले जात आहे.
तरसोद ते फागणे टप्प्याचे काम ठप्प
तरसोद ते चिखली टप्प्यासाठी मक्तेदार बदलल्यानंतर आता कुठे हे काम सुरू झाले होते. मात्र तरसोद ते फागणे टप्प्याचे काम मात्र अद्यापही रखडले आहे. या टप्प्याच्या मक्तेदाराला निरव मोदी प्रकरणामुळे बँकेकडून अर्थसाह्ण मिळण्यात अडचणी येत असल्याने हे काम रखडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या ठिकाणी सपाटीकरण केलेले होते, तेथे पावसामुळे आता हिरवळ उगवली आहे. केवळ एक-दोन ठिकाणी मोºयांचे काम सुरू आहे. याच मक्तेदाराकडे वळण रस्त्याचा भागही असल्याने काम ठप्पमुळे शहरातील वाहतुकीवरील बोजा कायम आहे. काही दिवसांत मक्तेदाराची आर्थिक समस्या दूर होऊन कामाला सुरूवात होईल, असे ‘नही’च्या अधिकाºयांकडून सांगितले जात आहे. याबाबत मक्तेदाराच्या अधिकाºयाशी संपर्क साधला असता बँकेच्या अर्थसह्णाचा विषय मार्गी लागला असून लवकरच कामाला पुन्हा सुरूवात होणार असल्याचे सांगितले.

Web Title: In spite of BJP's power, four-len road were burnt in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.