स्वच्छ, सुंदर शहरासाठी लोकसहभागातून कामांना गती द्या - सुरेशदादा जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:18 PM2018-04-13T12:18:01+5:302018-04-13T12:18:01+5:30

‘रोटरी कट्टा’चे थाटात भूमीपूजन

Speed ​​up work from public participation | स्वच्छ, सुंदर शहरासाठी लोकसहभागातून कामांना गती द्या - सुरेशदादा जैन

स्वच्छ, सुंदर शहरासाठी लोकसहभागातून कामांना गती द्या - सुरेशदादा जैन

Next
ठळक मुद्देरुग्णालयाच्या विकासासाठी डॉक्टराशी चर्चा करणारसुशोभिकरणाकरीता येणा-या प्रस्तावाचा त्वरीत विचार केला जाईल

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १३ - शहरातील उद्यानांसह विविध चौक महापालिकेने उपलब्ध करून दिले असून त्यांचा विकास करण्यासाठी विविध संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी करीत स्वच्छ, सुंदर जळगावसाठी लोकसहभागही आवश्यक आहे, त्यासाठी संस्थांनी कामांना गती द्यावी, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
महानगरपालिका व रोटरी जळगाव ईस्ट आयोजित ‘रोटरी कट्टा’चे गुरुवारी सकाळी आकाशवाणी चौकात भूमीपूजन झाले, त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, छबीलभाई शहा, रोटरी जळगाव ईस्टचे अध्यक्ष डॉ. गोविंद मंत्री, मानद सचिव मनीष पात्रीकर, सुबोध चौधरी उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते ‘रोटरी कट्टा’चे भूमीपूजन करण्यात आले.
रुग्णालयाच्या विकासासाठी डॉक्टराशी चर्चा करणार
सुरेशदादा जैन पुढे म्हणाले की, शहरातील विविध चौकांसह नानीबाई रुग्णालयाही विकासीत करायचे आहे, त्यासाठी शहरातील काही डॉक्टरांशी आपण चर्चा करून याबाबत सूचना देणार असल्याचेही सुतोवाच सुरेशदादा जैन यांनी केले.
शिवाजी उद्यानाच्या सुशोभिकरणाच्या प्रस्तावाचा विचार व्हावा
शहरातील शिवाजी उद्यानदेखील सुशोभिकरणाच्या प्रतीक्षेत असून या ३० एकर सुशोभिकरणाकरीता जैन उद्योग समुहाने दिलेल्या प्रस्तावाचा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी करावा तसेच शहराच्या विकासाकरीता रोटरी जळगाव ईस्टसारख्या विविध समाजसेवी संस्थांनी पुढे येवून योगदान द्यावे, असेही आवाहन सुरेशदादा जैन यांनी केले.
सुशोभिकरणाकरीता येणा-या प्रस्तावाचा त्वरीत विचार केला जाईल
सुरेशदादा जैन यांनी शहर सुशोभिकरणाचा विचार करण्याविषयी सूचविल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर म्हणाले की, शहर सुशोभिकरणाकरीता येणाºया प्रस्तावाचा त्वरीत विचार केला जाईल. याकरीता विविध संस्थांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले. ललित कोल्हे यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रोजेक्ट चेअरमन लक्ष्मीकांत मणियार, को-चेअरमन महेश खटोड, आकीर्टेक्ट शिरीष बर्वे, सुबोध चौधरी यांच्यासह मनपा अधिकारी व रोटरी जळगाव ईस्टचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन संजय गांधी यांनी केले तर वर्धमान भंडारी यांनी आभार मानले.
सुबोनियो प्रायोजित या कार्यक्रमात प्रायोजक सुबोध चौधरी, सुनील चौधरी, डॉ. गोविंद मंत्री, लक्ष्मीकांत मणियार आदींचा उपस्थितांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
 

Web Title: Speed ​​up work from public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव