चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट

By चुडामण.बोरसे | Published: November 26, 2023 08:43 PM2023-11-26T20:43:32+5:302023-11-26T20:43:47+5:30

चाळीसगाव (जि. जळगाव) :   चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड निकुंभ परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गारपीट तसेच ...

snow fall and storm in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट

चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट

चाळीसगाव (जि. जळगाव) :  चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड निकुंभ परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गारपीट तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.  दुष्काळी परिस्थिती असताना थोड्याफार प्रमाणात असलेले कांदा व कापूस पिके यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

तालुक्यात पिंपळवाड निकुंभ, नांद्रे, काकडणे, तळोंद्रे प्र. दे. आदी ठिकाणी सायंकाळी सहा ते पावणेसात वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. पिंपळवाड निकुंभ येथे सायंकाळी ६ वाजता पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान ३० मिनिटे गारपीट झाल्याने कपाशीसह कांदा व फळबागांचे नुकसान झाले आहे. नांद्रे, काकडणे, तळोंदे प्र. दे. व काकडणे येथेही वादळी वाऱ्यासोबत गारपीट झाली आहे.

Web Title: snow fall and storm in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.