स्मृतिगंध दरवळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 04:13 PM2017-09-19T16:13:29+5:302017-09-19T16:13:51+5:30

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय पाठक यांचा लेख

Smile tumble | स्मृतिगंध दरवळला

स्मृतिगंध दरवळला

Next

जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम करण्याचा सर्वसामान्य प्रकार म्हणजे फळ वाटप, रक्तदान शिबिरे, पोस्टर्स, होर्डिग्जच्या माध्यमातून प्रसिद्धी करून घेणे. वृत्तपत्रातून श्रद्धांजलीच्या जाहिरातीतून स्वत:चे फोटो झळकवणे. यामुळे हे दिवस या संबंधित व्यक्तींना अभिवादन करण्यासाठी, की स्वत:ला जाहिरातीत चमकवण्यासाठी, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडतो. मात्र दुस:याला आनंद देण्यासाठी, समाजाचे आपण देणे लागतो त्यातून उतराई होण्याची संकल्पना जळगावातील डॉ.रणजित चव्हाण कुटुंबियांनाच सुचते. डॉ.चव्हाण यांचे वडील मालोजीराव चव्हाण यांचे 2004 मध्ये निधन झाले. त्यांनी आपल्या मुलांना समाज, देश, सरकार याविषयी कृतज्ञता बाळगण्याची शिकवण दिली. आपले शिक्षण, प्रगती ही जरी मेरीटवर झालेली असली तरी आपल्यावर समाजाचे ऋण असतात ती कधीही विसरू नका. त्याकडे गांभिर्याने लक्ष द्या म्हणून मुलांना सांगितले. मालोजीराव चव्हाणांचे निधन झाल्यानंतर त्यांचा 11 सप्टेंबर हा वाढदिवसाचा मुहूर्त साधत त्यांच्याच शिकवणुकीनुसार समाजाचे आपण देणे लागतो, त्यातून उतराई झाले पाहिजे, असा चंग बांधत जळगावकर रसिकांसमोर स्मतिगंध या नावाने दर्जेदार, निखळ आनंद देणारा विनाशुल्क सांस्कृकि कार्यक्रम देण्याचे ठरवले आणि गेली 12 वर्षे हा स्मतिगंध दरवळत आहे. 2005 मध्ये सुवर्णा माटेगावकर आणि पराग माटेगावकर यांचा 1940 ते 1965 या काळातील जुन्या हिंदी गाण्यांचा प्रवास सांगणारा पहिला कार्यक्रम स्मृतिगंध अंतर्गत सादर झाला आणि नंतर दर्जेदार कार्यक्रमांचा गेली 12 वर्षे वर्ष सिलसीला सुरूच राहिला. 2006 मध्ये कार्यक्रमात बदल म्हणून विसूभाऊ बापट यांचा ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या कार्यक्रमाद्वारे काव्याचादेखील कार्यक्रम आनंददायी असतो हे चव्हाण कुटुंबियांनी दाखवून दिले, तर 2007 मध्ये पराग रानडे आणि श्रद्धा रानडे या पुण्याच्या नामवंत गायकांनी मराठी भावगीतांचा सुरेख असा नजराणा पेश केला. 2008 मध्ये कवी प्रा.प्रवीण दवणे यांचा गाजलेला सावर रे कार्यक्रम सादर केला गेला. पाठोपाठ 2009 मध्ये सा रे ग म प चे गायक अनजा वर्तक आणि महेश मुतालिक यांनी बहारदार भाव सरगम सादर केला. 2010 मध्ये कवी बा. भ. बोरकर जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या कवितांचा परिचय व्हावा म्हणून नागपूरच्या सप्तक ग्रुप प्रस्तूत ‘जीवन यांना कळले हो’ हा सुंदर कार्यक्रम सादर करून डॉ.चव्हाणांनी स्मृतिगंधबद्दल जळगावकरांच्या अपेक्षा वाढवल्या. यानंतर काही हलके-फुलके देण्यासाठी पुढील वर्षी सांगलीच्या सप्तकने 1945 ते 1970 या काळातील निवडक हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर केला. अन पुढे हा जुन्या गाण्यांचा सिलसिला सुरू राहिला. आजच्या चित्रपट गीतांची जुन्या गीतांशी तुलना केली असता ती आजही सदाबहार वाटतात. अवीट गोडीची चालीची ही गीते ऐकावीशी वाटतात. त्यामुळेच स्मृतिगंध ऐकण्यासाठी युवा वर्गापेक्षा ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड गर्दी असते. गेल्या शनिवारी झालेल्या स्मूतिगंधला याची परत प्रचिती आली. संगीतकार रोशन यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून संगीतकार रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा नजराणा स्मृतिगंधमध्ये आरती दीक्षित ग्रुपने ‘रहे ना रहे’ अंतर्गत सादर करत रसिकांना गाजलेल्या अजरामर गीतांनी डोलायला लावले. हा दरवळणा:या आनंददायी गंधाने सायंकाळ चिरतरूण केली.

Web Title: Smile tumble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.