पारोळ््याजवळ अपघातात सहा जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:41 PM2019-03-28T23:41:51+5:302019-03-28T23:42:04+5:30

चालकास दरवाजा तोडून काढले बाहेर

Six people injured in accident in Parola | पारोळ््याजवळ अपघातात सहा जण जखमी

पारोळ््याजवळ अपघातात सहा जण जखमी

Next

पारोळा, जि. जळगाव : आशिया महामार्ग ४६ वर पारोळा-जळगाव रस्त्यावर कुटीर रुग्णालयाजवळ ट्रक आणि कोंबड्या वाहतूक करणाऱ्या वाहनांची समोरासमोर धडक होऊन सहा जण जखमी झाले. त्यात दोन जण गंभीर आहेत. त्यांच्यावर पारोळा कुटीर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून धुळे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
२८ रोजी दुपारी ४.४५ वाजता आशिया महामार्गावर कुटीर रुग्णालयाजवळ सांताक्रूझ, मुंबई येथून घरसामानाचे साहित्य भरून बाळापूरकडे (शेगांव) निघालेला ट्रक क्र.(एम.एच. ४८ ए .वाय. ९८६७) हा पारोळ्याकडून जळगावकडे जात असताना समोरुन येणारे कोंबड्या वाहतूक करणारे वाहनामध्ये (एम.एच. १९ बी.एम.४०२६) धडक झाल्याने ट्रक रस्त्याच्याकडेला खाली उतरून खड्ड्यात पडला. चालक अब्दुल रशीद व बाजूला बसलेला महमद अदनान या दोघांना ट्रकचे दोन्ही बाजूचे दरवाजे तोडून बाहेर काढावे लागले. अपघातात ट्रकमधील रफिक अब्दुल (६२), अब्दुल रशीद (४९), मोहम्मद अदनान (१७), फैमीदा अहमद (४३) हे जखमी झालेत तर पोल्ट्रीच्या वाहनात एरंडोल येथून लग्न आटोपून नाशिक येथे घरी परत जाणारे एका कुटुंबातील सदस्य होते. भटू प्रताप पवार (४२), धनराज गंगाराम चव्हाण (४४) हे दोन्ही जण जबर जखमी झालेत. या सर्व जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे, डॉ.जैन, राजू वानखेडे, राजू सोनार व परिचारिका यांनी प्राथमिक उपचार केले व रुग्णवाहिकेतून प्रमोद पाटील यांनी या जखमींना धुळे सामान्य रुग्णालयात दाखल केले.
कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनात प्रवाशी म्हणून बसलेले सिद्धांत धनराज चव्हाण या चार महिन्यांच्या बालकाला साधे खरचटलेदेखील नाही. या सोबतच सृष्टी धनराज चव्हाण (८), रुपाली भटू पवार, छाया भटू पवार, अश्विनी धनराज चव्हाण आदी जण या अपघातातून बचावले. अपघाताचे वृत्त समजताच पो.हे.कॉ.बापू पाटील, विनोद साळी, इकबाल शेख व वाहतूक पोलिसांनी मदत कार्य व वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Six people injured in accident in Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव