संपामुळे जळगाव जिल्हावासीयांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 09:59 PM2019-01-08T21:59:21+5:302019-01-08T21:59:36+5:30

मेडिकल बंदमुळे रुग्णांची फिराफीर

The situation of Jalgaon District residents due to the strike | संपामुळे जळगाव जिल्हावासीयांचे हाल

संपामुळे जळगाव जिल्हावासीयांचे हाल

googlenewsNext

जळगाव : खाजगीकरणाला विरोध, सरकारचे कामगार विरोधी धोरण याविरुद्ध देशव्यापी संपात टपाल, बँक कर्मचारी, असंघटित कामगार, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी, गटप्रवर्तक सहभागी झाल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम होऊन जिल्हावासीयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बँकांमधीन पैसे काढता येईना की एटीएममध्ये पैसे उपलब्ध होत नसल्याने बँक ग्राहकांचे हाल होत आहे. या सोबतच औषधी विक्रेत्यांनी दुपारपर्यंत पुकारलेल्या बंदमुळेही रुग्णांचे हाल झाले. ९ रोजीदेखील संप सुरू राहणार आहे.
जामनेर
विविध मागण्यांसाठी बँक अधिकारी व कर्मचाºयांनी पुकारलेल्या बंदमध्ये शहरातील दोनच बँका सहभागी झाल्याने ग्राहक सेवेवर विशेष परिणाम जाणवला नाही. सेंट्रल बँक व बँक आॅफ महाराष्ट्रचे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने या दोन्ही बँकेतील खातेदार ग्राहकांची मात्र कुचंबणा झाली. स्टेट बँक, आयडीबीआय, युनीयन बँकेत व्यवहार सुरळीत सुरू होते. उद्या ९ रोजी देखील संपात सहभागी होणार असल्याचे या दोन्ही बँकांकडून सांगण्यात आले.
एरंडोल
असंघटीत कामगार, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी, गटप्रवर्तक हे मंगळवारी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध देशव्यापी संपात सहभागी झाले.त्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. बँक कर्मचारी, टपाल विभागाचे कर्मचारी हेसुद्धा संपात सहभागी झाल्यामुळे बँक व्यवहार व टपाल वितरण व्यवस्था ठप्प झाली. परिणामी ग्राहक व नागरिकांची गैरसोय झाली. औषध विक्रेत्यांचा दुपारी तीन वाजेनंतर औषध दुकाने खुली झाली. औषध विक्रेता संघटनेचे तालुका अध्यक्ष कैलास ज्ञाती यांनी हा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.
धरणगाव
धरणगाव, पिंप्री, सोनवद, पाळधी यासह तालुक्यातील सर्वच टपाल कार्यालयातील व बीएसएनएल विभागाचे कर्मचारी कर्मचारी संपावर असल्याने टपाल दोन्ही विभागाची कामे खोळबंले. धरणगाव, अमळनेर, व पारोळा या अमळनेर उपविभात येणाºया ९३ टपाल कार्यालयातील एकूण ७० कर्मचारी संपात सहभागी झाले. तसेच भारतीय दूरसंचार कार्यालयातील सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. मात्र धरणगाव तालुक्यातील बँकांचे व्यवहार सुरळीत सुरु होते. धरणगाव शहरासह तालुक्यातील ६० औषधे दुकाने बंद होत्या.
भडगाव
शहरासह तालुक्यातील टपाल कर्मचाºयांच्या संपामुळे महत्त्वाचे कागदपत्र, मनीआॅर्डर, नोकरीचे आॅर्डर, शेतकºयांचे शासकीय अनुदान यासह विविध कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे. भडगाव शहरात राष्टÑीयकृत बँकांचे कामकाज सुरळीत सुरू होते. कोणतीच कर्मचारी संघटना संपात सहभागी झाले नव्हते.
अमळनेर
सर्व कर्मचारी कृती समितीचे १५५ कर्मचारी संपावर उतरले आहेत. महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपन्यांतील वीज कर्मचारी संपात सहभागी आहेत.
बोदवड
सकाळ पासूनच औषध विक्रेत्यांनी औषध विक्रीचे दुकान दुपार पर्यंत बंद ठेवत निषेध व्यक्त केला. या बंद मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
भुसावळ
भुसावळ विभागात सर्व संघटनांचे ९० टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. शासनाच्या कर्मचारी धोरणाविरोधात ८ आणि ९ जानेवारी असे दोन दिवस टपाल कर्मचारी संपावर आहेत.
मुक्ताईनगर
तालुका व शहरात टपाल सेवा वगळता अन्य सर्व क्षेत्रातील सेवा सुरळीत सुरू होत्या. विशेष म्हणजे बँकिंग सेवा सुरळीत होती तर दुसरीकडे औषध विक्री दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आले होते.

Web Title: The situation of Jalgaon District residents due to the strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव