ठळक मुद्दे फसवणुकीचा गुन्हा दाखल  बांभोरी शिवारातील दोन हेक्टर जमिन हडपलीबहिण परराज्यात राहत असल्याचा घेतला गैरफायदा

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,९ : खोट्या सह्या व बक्षीसपत्र तयार करुन बहिणीच्या नावावर असलेली दोन हेक्टर १५ आर इतकी शेत जमीन भावानेच हडप केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. भाऊ राजेश विश्वंभर शर्मा याच्याविरुध्द शहर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  तक्रारदार कल्पना अतुल जेटली (वय ६०, रा.गाझियाबाद, उत्तर प्रदेश) यांचे जळगाव माहेर आहे. शहरातील दिक्षीतवाडी येथील रहिवाशी तथा जेटली यांचे वडील विश्वंभर शिवप्रसाद शर्मा हे मयत असून त्यांना  राजेश व रमेश नावाचे दोन मुले तर शोभा, कल्पना व साधना नाव्याच्या तीन मुली आहे. यातील मुलगा रमेश व मुलगी शोभा मयत झाले आहे.


राजेश शर्मा याने २०१७ मध्ये बांभोरी येथील शेतगट नं २४७/१ हेकटर ०.५९ आर पोट क्षेत्र १ हेक्टर ५६ आर एकूण क्षेत्र २ हेक्टर १५ असे बहीण कल्पना यांच्या नावाने १०० रुपयांच्या स्टॅम्प बनावट बक्षीसपत्र तयार करून त्या आधारे त्यांचे नाव शेतातून कमी करून त्याच्या नावे शेतजमीन करून घेतली. हा प्रकार लक्षात आल्याने कल्पना जेटली यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्राराची चौकशी होवून कल्पना जेटली यांच्या फिर्यादीवरून भाऊ राजेश विश्वंभर शर्मा यांच्याविरुध्द जिल्हापेठ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
फसवणुकीचा गुन्हा शहर पोलिसात वर्ग
शर्मा कुटुंबिय दिक्षीतवाडी येथे राहत असल्याने सुरवातीला गुन्हा जिल्हापेठ पोलिसात दाखल करण्यात आला. परंतू  कल्पना जेटली यांच्या नावाने तयार केलेले बनावट बक्षीसपत्र तहसिल कार्यालय परिसरात तयार करून सादर करण्यात आल्याने फसवणुकीचा गुन्हा शहर पोलिसात वर्ग करण्यात आला आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.