मौन एक गूढ साधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:22 PM2019-07-12T12:22:37+5:302019-07-12T12:26:24+5:30

‘मौन’ या विषयी तरूण वयापासूनच खून आकर्षण

Silence is a mysterious silence | मौन एक गूढ साधना

मौन एक गूढ साधना

Next

‘मौन’ या विषयी मला तरूण वयापासूनच खून आकर्षण होतं. विशेषत: गीता प्रथमच वाचतांना विभूतियोग (अध्याय १०) वा मध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपल्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या विभूति अर्जुनला सांगतांना, गुप्त ठेवायच्या गोष्टींमध्ये मौन हे माझे स्वरूपं आहे. असे सांगितले. अध्यात्मज्ञान ही सहसा गुप्त विधत्व म्हटली जाते. आत्मज्ञान असलेले महात्मे सहसा मौन रहाणचं पसंत करतात. त्यानंतर बुद्धाच्या कथेमध्ये त्याचा शिष्य आनंदला भगवान बुद्धाने मौनाच प्रतिक म्हणून पूर्ण उमललेलं पांढरशुभ्र कमळाच फूल दिलं. मला खूप दिवस या गोष्टीचा अर्थच समजत नव्हता. मात्र एकदा भर उन्हाळ्यात पिवळ्या फुलांनी पूर्णपणे भरून गेलेले एक जंगलातील झाड पाहिलं. आणि मला बुद्धाने मौनाच प्रतिक म्हणून शिष्याला फूल का दिलं ते समजल. कारण ही फुले आपल्या संपूर्ण शक्तीनिशी फुललेली असतात, न बोलताही त्यांचे अस्तित्व आनंदाने बोलते. या सगळ्या गोष्टींमुळे मी मौनाची शक्ती पडताळण्याचे ठरविले. १९९२ साली ‘आषाढी एकादशी’ला सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत १२ तासांचे संपूर्ण मौनव्रत पाळायचा निश्चय केला. सुरूवातीला अडचणी आल्या.मात्र कुठेही गाडी अडली नाही. गरज पडेल तेथे कागदाचा वापर केला. काम सुरळीत, एकाग्रतेने होत असल्याचे आढळले. दिवसभर बोलणाऱ्या शब्दांमागे खर्च होणारी उर्जा वाचली. मनाची चरणचरण बंद झाली. आपण स्वत: शी कधी संवाद करतच नाही. मौनाच्या निमित्ताने स्वत:शी संवाद करता आला. मौनव्रताला आज सव्वादोन तप होत आहेत.
-हेमंत बेलसरे, अध्यक्ष, सुधर्मा सामाजिक संस्था, जळगाव.

Web Title: Silence is a mysterious silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव