ज्येष्ठ नेते अ‍ॅड.गोविंद पानसरे हत्येप्रकरणात साकळीच्या युवकाच्या सहभाग यावल तालुक्यात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 11:47 PM2018-12-02T23:47:23+5:302018-12-02T23:48:29+5:30

तीन महिन्यांपूर्वी नाला-सोपारा बाँबस्फोटप्रकरणी तर आता आधुनिक विचारसरणीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड़ गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने यावल तालुक्यातील साकळी येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास अटक केल्याचे ‘लोकमत’ वाचताच साकळीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Senior leader Advocate Govind Pansare murder case: Junk | ज्येष्ठ नेते अ‍ॅड.गोविंद पानसरे हत्येप्रकरणात साकळीच्या युवकाच्या सहभाग यावल तालुक्यात खळबळ

ज्येष्ठ नेते अ‍ॅड.गोविंद पानसरे हत्येप्रकरणात साकळीच्या युवकाच्या सहभाग यावल तालुक्यात खळबळ

Next
ठळक मुद्देतीन महिन्यांपूर्वीच घेतले होते ताब्यातदहशतवादाची साखळी तालुक्यातपर्यंत पोहोचल्याचा धक्का

यावल, जि.जळगाव : सुमारे तीन महिन्यांपूर्वी नाला-सोपारा बाँबस्फोटप्रकरणी तर आता आधुनिक विचारसरणीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड़ गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने यावल तालुक्यातील साकळी येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास अटक केल्याचे ‘लोकमत’ वाचताच साकळीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गेल्या तीन महिन्यांपूर्वी तालुक्यातील साकळी येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी या २८ वर्षीय युवकास ६ सप्टेंबर रोजी नालासोपारा बाँम्बस्फोट प्रकरणी ताब्यात घेतले होते, तर दुसऱ्याच दिवशी साकळी येथील लोधी वाड्यातील विजय उर्फ भैया उखर्डू लोधी (वय २८) या युवकास ताब्यात घेतल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली होती.
गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई दहशदवादविरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या या युवकांपैकी शनिवारी बंगळुरू येथील एसआयटीच्या पथकाने वासुदेव सूर्यवंशी यास ज्येष्ठ नेते अ‍ॅड़ गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात मारेकºयांना दुचाकी व विस्तुल पुरविल्याप्रकरणी शनिवारी अटक केल्याचे ठळक वृत्त रविवारी ‘लोकमत’ने पहिल्याच पानावर घेतल्याने साकळीसह तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दहशतवादाचंी ही साखळी तालुक्यापर्यंत पोहोचली असल्याचे पाहून तालुकावासीयांना प्रचड धक्का बसला आहे. साकळीच्या दोन्ही युवकांना एटीएसने ताब्यात घेतल्यानंतर चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे आजपर्यंत गावासह तालुक्यात माहीत होते, मात्र अ‍ॅड़ गोविंद पानसरे यांच्या हत्येत सूर्यवंशी सहभागी होता. तसेच हत्येच्या कटासाठी वेळोवेळी झालेल्या बैठकीसही तो हजर असल्याचे वाचून तालुकावासीयांना प्रचंड धक्का बसला आहे. गेल्या १५ वर्षापासून अनेक वर्षापासून गावात मोटारसायकल दुरूस्तीचे गॅरेज चालवणारा आणि अध्यात्माची ओढ असलेला शिवभक्त म्हणून वासुदेवची गावात ओळख होती. या वृत्ताने साकळीकरांना प्रचंड धक्का बसला आहे. गावात आज जागोजागी या वृत्ताचीच चर्चा होती. वासुदेव सूर्यवंशीच्या या वृत्तामध्ये विजय उर्फ भैय्या उखर्डू लोधी याचे नाव नसल्याने त्याचे काय झाले, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Web Title: Senior leader Advocate Govind Pansare murder case: Junk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.