गुन्हा टाळण्यासाठी पीडितेला पैशांची ‘आॅफर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:17 PM2019-06-25T12:17:07+5:302019-06-25T12:17:42+5:30

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

To save the crime, the victim's money 'seek' | गुन्हा टाळण्यासाठी पीडितेला पैशांची ‘आॅफर’

गुन्हा टाळण्यासाठी पीडितेला पैशांची ‘आॅफर’

Next

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी समाज कल्याण विभागाचा सहाय्यक आयुक्त योगेश सुभाषराव पाटील (रा.गणपती नगर, जळगाव मुळ रा.चाळीसगाव) याच्याविरुध्द सोमवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात तरुणीला मारहाण करुन घराबाहेर हाकलून लावणारी योगेशची पत्नी व वडील सुभाषराव पाटील यांच्याही विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत तरुणी समाजकल्याण विभागातंर्गत चालविण्यात येणाऱ्या एका संस्थेत कंत्राटी पध्दतीने नोकरी करीत आहेत. कामानिमित्ताने योगेश पाटील याच्याशी तिचा संपर्क आला. त्यानंतर व्हॉटस्अ‍ॅपवर चॅटींग तसेच घरी जेवणासाठी येणे-जाणे वाढले. दोघांमध्ये प्रेमप्रकरण बहरल्याने योगेश याने पीडित तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून त्याच्या गणपती नगरात डिसेंबर २०१८ पासून सातत्याने बलात्कार केला.
आजार निष्पन्न होताच नकार
पीडित तरुणी आजारी राहत असल्याने १५ मे २०१९ रोजी नाशिक येथील एका दवाखान्यात तपासणी केली असता ब्रेस्ट कॅन्सरची लागण झाल्याचे निदान झाले. या आजाराबाबत योगेश पाटील याला सांगितले असता आता तु माझ्या कामाची नाही असे सांगून संपर्क तोडला. त्याच्या घरी गेले असता त्याने घरातून हाकलून लावले.
पत्नी व वडीलांनी दिले आमिष
पत्नी असतानाही मी तुला नांदवेल, पत्नीची मी समजूत काढेल असे योगेश पाटीलने सांगितले होते, मात्र लग्नास नकार दिल्याने पीडिता त्याच्या घरी गेली असता पत्नी सीमा यांनी दोघांमधील संबंधाची माहिती घेतली. त्यांना मोबाईलमधील स्क्रीन शॉर्टचे पुरावे दाखविले असता हे प्रकरण बंद करण्यासाठी काय करावे लागेल. तुला पैसे देते पण हे प्रकरण बंद कर असे सांगितले. त्यानंतर त्याच्या वडीलांनीही शनिवारी मू.जे.महाविद्यालयाच्या परिसरात बोलावले व माझ्या मुलाला वाचव, हवे तेवढे पैसे घे म्हणून विनंती केली, मात्र मी लग्नावर ठाम असल्याने त्यांनी पीडितेच्या कुटुंबाशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
पीडितेच्या आईला मारहाण... या प्रकरणात मार्ग काढण्यासाठी सुभाषराव पाटील यांनी रविवारी सकाळी मोबाईलवर संपर्क करुन तु माझ्या सुनेसोबत राहू शकते का? अशी विचारणा केली, त्यावर पीडितेने होकार दिला असता कुटुंबाशी बोलतो म्हणून फोन बंद केला. त्यानंतर पीडिता आईला घेऊन चाळीसगाव येथे गेली असता तेथे कोणीच नव्हते. त्यामुळे पीडिता व तिची आई पुन्हा जळगावला गणपती नगरात योगेशच्या घरी गेले असता तेथे योगेशची पत्नी सीमा व वडीलांनी मारहाण करुन हाकलून लावले. तुझे बेडरुममधील फोटो नष्ट केले असे सांगून आमचे बोलणे रेकॉर्डींग केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकारानंतर पहाटे अडीच वाजता पीडितेने रामानंद नगर पोलिसात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे करीत आहे.

Web Title: To save the crime, the victim's money 'seek'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव