सावदा ते रावेर महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 04:33 PM2019-07-14T16:33:21+5:302019-07-14T16:35:18+5:30

सावदा ते रावेर दरम्यान अंकलेश्वर बºहाणपूर महामार्गावर काही दिवसांपूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम झाले होते. पण रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे काम अर्धवट असल्यामुळे अपघात होत आहे.

Savda to Raver highway leads to death trap | सावदा ते रावेर महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा

सावदा ते रावेर महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा

googlenewsNext
ठळक मुद्देरस्त्यावरील साईड पट्ट्या देत आहे अपघाताला आमंत्रणसावदा-रावेर दरम्यान आठ दिवसात दहावर अपघातकठडे उंच असल्याने वाहन उलटण्याच्या प्रकारात वाढ

दिलीप सोनवणे
निंभोरा बुद्रूक, ता.रावेर, जि.जळगाव : सावदा ते रावेर दरम्यान अंकलेश्वर बºहाणपूर महामार्गावर काही दिवसांपूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम झाले होते. पण रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे काम अर्धवट असल्यामुळे अपघात होत आहे.
वाघोदा ते वडगाव, निंभोरा फाटा ते विवरा या दरम्यान आशा पारेख पुलाजवळ रस्ता जास्तच सटकता आहे. यामुळे गेल्या आठ दिवसात ठिकठिकाणी दहावर मालवाहतूक उलटले, तर काही तिरपे झाले आहेत.
यूपी-२५-डीटी-४२६९ क्रमांकाचा ट्रक उत्तर प्रदेशातून जालना येथे मैदा नेत होता. तेव्हा विवरा ते निंभोरा फाटा दरम्यान समोरून गाडी आल्याने साईडला दाबताच साईडपट्टी नसल्याने उटलला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. पण मालाचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. याला जबाबदार कोण? असे प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. आतापर्यंत किरकोळ अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. रस्त्याचे व जमिनीचे अंतर जास्त व त्यात सटकती उतरती कळा यामुळे अपघात होत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

Web Title: Savda to Raver highway leads to death trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.