सत्ताधारी नगरसेवक एकवटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:13 PM2018-07-20T23:13:35+5:302018-07-20T23:14:19+5:30

अमळनेर पालिका : विरोधी गटातील नगरसेवकास अपात्र ठरवा

Ruling councilors gathered! | सत्ताधारी नगरसेवक एकवटले !

सत्ताधारी नगरसेवक एकवटले !

Next


अमळनेर, जि.जळगाव : पालिकेतील विरोधी गटाचे नगरसेवक सलीम शेख चिरागोद्दीन उर्फ सलीम टोपी यांना अपात्र करावे, तसेच उच्च न्यायालयात बनावट कागदपत्रे दाखल केली म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार सत्ताधारी गटातील २१ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांंकडे केली आहे.
सलीम टोपी यांचे यांचे गांधलीपुरा येथील घर अतिक्रमित असून, ते पाडण्याचे आदेश १० जानेवारी २००७ रोजी व ३१ आॅगस्ट २०१३ रोजी जिल्हाधिकाºयांनी दिले होते, मात्र त्याची अंमलबाजवणी झाली नाही. उलट सलीम टोपी यांनी या विवादित घरावर पुन्हा दुसरा माळा बांधकाम करून लगतच्या भागात नवीन बांधकाम केले. तत्कालिन मुख्याधिकाºयांना आदेश देऊनही बांधकाम पाडण्यात आलेले नाही. प्रांताधिकाºयांनीही बांधकाम अतिक्रमित असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र न.प.अधिनियम १९६५ च्या कलम ४४ (१) इनुसार सलीम शेख याना अपात्र ठरवून भा.दं.वि.४०५, ४२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, रत्नाबाई महाजन, रत्नमाला माळी, कमलबाई पाटील, राजेश पाटील, प्रा.रामकृष्ण पाटील, चंद्रकला साळुंखे, संजय मराठे, निशांत अग्रवाल, विवेक पाटील, चेतना पाटोल, गायत्री पाटील, मनोज पाटील, निशांतबानो कुरेशी, नरेंद्र संदनशिव, सुरेश पाटील , संतोष पाटील, नूतन पाटील, शीतल यादव, सलीम शेख फत्तू, अभिषेक पाटील यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
नगरसेवक सलीम शेख व त्यांच्या पत्नी माजी उपनगराध्यक्षा सबनुरबी शेख यांनी अपात्रता प्रकरणी जिल्हाधिकाºयांकडे व उच्च न्यायालयात न. पा. अधिकाºयांंचे खोटे व बनावट सह्यांचे दस्ताऐवज दाखल करून शासनाची फसवणूक उघडकीस आल्याने जिल्हाधिकाºयांनी त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जून २०१६ पासून हे आदेश असूनही कारवाई होत नाही, अशीही तक्रार आहे.

अपात्रतेबाबत उच्च न्यायालयात चौकशी सुरू होती. त्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती, मात्र ६४ आठवडे उलटले तरी अहवाल दिलेला नाही. एकाच मुद्यावर वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. सत्ताधाºयांच्या विरोधात तक्रार केल्याने साहजिक ते तक्रार करणार आहेत. चौकशीत सत्य बाहेर येईलच.
-सलीम शेख चिरांगोद्दीन, नगरसेवक, प्रभाग पाच

Web Title: Ruling councilors gathered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.