चाळीसगावात रोपांचे वाण देऊन महिलांनी केला वृक्ष संवर्धनाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 04:55 PM2018-01-24T16:55:45+5:302018-01-24T16:59:02+5:30

श्री समर्थ प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेतर्फे तालुक्यातील टाकळी प्रचा मधील श्रीरामनगरातील महिलांनी या पारंपारिक कार्यक्रमाला वृक्षारोपणाची जोड देत, सुदृढ आरोग्याची काळजी घेऊन बेटी बचाव, बेटी पढावचा संदेश देत वाण म्हणून महिलांनी रोपांचे वाटप केले.

Resolve to save trees by giving them varieties of seedlings in 40 villages | चाळीसगावात रोपांचे वाण देऊन महिलांनी केला वृक्ष संवर्धनाचा संकल्प

चाळीसगावात रोपांचे वाण देऊन महिलांनी केला वृक्ष संवर्धनाचा संकल्प

Next
ठळक मुद्देयोग्य व्यायाम व ताणतणाव विरहीत जीवन जगामकर संक्रांतीचे वाण म्हणून केले रोपांचे वाटपमुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा मान्यवरांनी दिला संदेश

आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव : श्री समर्थ प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेतर्फे तालुक्यातील टाकळी प्रचा मधील श्रीरामनगरातील महिलांनी या पारंपारिक कार्यक्रमाला वृक्षारोपणाची जोड देत, सुदृढ आरोग्याची काळजी घेऊन बेटी बचाव, बेटी पढावचा संदेश देत वाण म्हणून महिलांनी रोपांचे वाटप केले.
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.विनोद कोतकर, डॉ.चेतना कोतकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या पत्नी स्मिता बच्छाव, श्री समर्थ प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव स्वाती चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. महिलांना मार्गदर्शन करतांना डॉ.चेतना कोतकर यांनी महिलांना आत्मनिर्भर बनण्याचा सल्ला दिला. स्मिता बच्छाव यांनी महिलांना शारीरीक मजबूत व कणखर बनण्याचा सल्ला दिला.
डॉ. विनोद कोतकर यांनी महिलांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार व योग्य व्यायाम तसेच ताणतणाव विरहीत जीवन जगण्याचा सल्ला दिला. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, सुंदर शरीर हाच स्त्रीचा खरा दागिना असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Resolve to save trees by giving them varieties of seedlings in 40 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.