जळगाव जि.प.च्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:29 PM2018-06-22T12:29:50+5:302018-06-22T12:29:50+5:30

जि. प. ची सभा

Resolution of empowering executive engineers of the irrigation | जळगाव जि.प.च्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव

जळगाव जि.प.च्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव

Next
ठळक मुद्देभ्रष्टाचाराचा सदस्यांचा आरोपअधिका-यांची त्रयस्त समितीकडून चौकशी करा

जळगाव : जि.प.तील लघु सिंचन विभागात भ्रष्टाचाराने कळस गाठला असून अधिकारी बैठकीला थांबत नाही, निर्णय घेत नाही असा आरोप करीत या विभागाचे कार्यकारी अभियंता आर.के. नाईक यांना कार्यमुक्त करण्यात यावे अशी मागणी करीत जि.प. सदस्यांनी तसा ठरावच सर्वसाधारण सभेत केला. या ठरावास सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला असून प्रशासन या बाबत काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
जि.प.ची सर्वसाधरण सभा गुरुवारी झाली. यामध्ये लघु सिंचन विभागातील भ्रष्टाचार, बुरशीयुक्त शेवया, हातपंप लावण्यात दिरंगाई, अर्थसंकल्प मंजुरी, मागील सभेतील विषयाची चुकीची नोंद या वरुन जि.प.ची सभा चांगलीच गाजली.
यामध्ये लघु सिंचन विभागातील तक्रारी व गैरकाराभाराचा पाढाच सर्वच सदस्यांनी वाचला. या विभागाचे अधिकारी बैठकीला थांबत नाही, कामांबाबत लोकप्रतिनिधींना विचारत नाही, त्यांना विश्वासात घेतले जात नाही, येथे ठेकेदारी लॉबी असून कामांना मंजुरी नसताना कामे केले जातात, असा आरोप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सदस्य नाना महाजन, मधुकर काटे यांनी केला. यास इतरही सदस्यांनी दुजोरा दिला. या वेळी मधुकर काटे यांनी कार्यकारी अभियंता नाईक यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव मांडला व त्यास सर्व सदस्यांनी बाक वाजवून पाठिंबा दिला. तर बुरशीयुक्त शेवया प्रकरणात दोन दिवसात पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर काही वेळातच अभियंता नाईक सभागृहातून निघून गेले.
अधिका-यांची त्रयस्त समितीकडून चौकशी करा
लघु सिंचन विभागातील कार्यकारी अभियंत्यांसह सर्वच शाखा अभियंता, उपअभियंता मंजूर कामामध्ये जास्त काम दाखवून वाढीव रक्कम काढतात, असा आरोपही करण्यात आला. त्यामुळे या सर्वांची त्रयस्थ समितीमार्फत चौकशी करा, अशीही मागणी सदस्यांनी केली.

Web Title: Resolution of empowering executive engineers of the irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.