जळगावात ग्रंथालये जोपासताहेत वाचन संस्कृती

By admin | Published: April 23, 2017 12:30 PM2017-04-23T12:30:43+5:302017-04-23T12:30:43+5:30

जिल्ह्यातही अनेक वर्षापासून ग्रंथालये, वाचनालयांनी वाचन संस्कृती जोपासली आह़े

Reading culture of Jalgaon libraries is growing | जळगावात ग्रंथालये जोपासताहेत वाचन संस्कृती

जळगावात ग्रंथालये जोपासताहेत वाचन संस्कृती

Next

ऑनलाइन लोकमत / किशोर पाटील
(पुस्तकदिन विशेष)

जळगाव, दि. 23 -  वाचाल तर वाचाल या म्हणीनुसार वाचन केल्याने ज्ञान वाढत़े जिल्ह्यातही अनेक वर्षापासून ग्रंथालये, वाचनालयांनी वाचन संस्कृती जोपासली आह़े जिल्ह्यात शासनमान्य एकूण 433 ग्रंथालये असून 9 ग्रंथालये शंभर वर्षापासून अवितरपणे पुस्तकाच्या रुपाने ज्ञानदानाचे कार्य करत आहेत तर 13 ग्रंथालये अ दर्जाची आह़े या व्यतिरिक्त शहरातील मु़ज़ेमहाविद्यालय तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अत्याधुनिक स्वरूपाची, वातानुकुलित ई-ग्रंथालये  विद्यार्थी घडविण्याचे काम करत आहेत़ जागतिक पुस्तकदिनाच्या निमित्ताने अशाचप्रकारे जिल्ह्याची वाचन संस्कृती टिकविण्याचे अविरत काम करणा:या ग्रंथालये, संस्थांचा घेतलेला हा आढावा़़़़
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा डिजिटल ज्ञानस्त्रोत
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सेंट्रल लायब्ररीने 25 व्या वर्षात पदार्पण केल़े काळानुरूप या वाचनालयाचे रुपडे पालटले आह़े 1 लाख स्क्वेअर फूट इतक्या जागेवर उभ्या असलेल्या मध्यवर्ती ग्रंथालयाचीचार मजली स्वतंत्र इमारत असून यात 1 लाख ग्रंथसंपदा आह़े  सर्व पुस्तकांचे संगणकीकरण झाले आह़े मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू अशा चार भाषांमध्ये चार हजार प्रबंध तसेच 200 नियतकालिके आहेत़
डिजिटल नॉलेज सेंटरमध्ये 1 हजार ई ग्रंथ
आधुनिक तंत्रज्ञानातही विद्यापीठ कुठेच मागे नाही़ विद्यापीठाने संशोधक विद्याथ्र्यासाठी डिजिटल नॉलेज सेंटर सुरू केले आह़े वातानुकुलित असलेल्या या सेंटरमध्ये 75 विद्यार्थी वाचन करू शकतील अशी अत्याधुनिक यंत्रणा आह़े यात एक हजार ई ग्रंथ तसेच 30 हजारापेक्षा जास्त ई जर्नल्स तसेच 4 ई डाटा बेसेस तसेच संशोधनपर साहित्य वाचनासाठी उपलब्ध आहेत़
उत्तर महाराष्ट्राच्या विद्यापीठाच्या ग्रंथालयात सानेगुरुजी यांचे हस्तलिखित 25 ग्रंथ विद्यापीठाने जतन केलेले आहेत़ तसेच ग्रंथालयातर्फे अमळनेरला फिलॉसॉफी सेंटर सुरू करण्यात आले आह़े 
वाचकांसाठी बेस्ट युझर्स अवार्ड
विद्याथ्र्याचा वाचनालयाकडे कल वाढावा यासाठी विद्यापीठातील ग्रंथालयातर्फे  नियमितपणे ग्रंथालयाचा लाभ घेणा:या वाचकास बेस्ट युझर्स अवार्ड या नावाने पुरस्कार दिला जातो़
व़वा़वाचनालयाकडे सव्वालाखांची ग्रंथसंपदा
 शहरात  1877 मध्ये वल्लभदास वालजी वाचनालयाची स्थापना झाली़ 140 वर्षापासून अविरतपणे वाचकांसाठी सेवा पुरविली जात आहे. सव्वा लाख पुस्तके या वाचनालयात आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पुस्तके असल्याचा मान या वाचनालयाला मिळतो. वाचनलयातील सर्व पुस्तकांचे संगणकीकरण झाले असून याद्या नोंदणी, पुस्तक देव-घेव आदी कामे संगणकावर होतात़ हे या वाचनालयाचे वैशिष्टय़ आहे.  
चार भाषांमध्ये साहित्य उपलब्ध
वाचनालयात मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच गुजराथी या भाषांमध्ये साहित्य उपलब्ध आह़े यात दुर्मीळ संदर्भ ग्रंथ, ज्ञानकोश, विश्वकोश, चरित्रग्रंथ, राज्यघटना यासह विविध विषयांवरील 1 लाख 25 हजार एवढी ग्रंथसंपदा आह़े वाचनालयाचे 3 हजार वाचक सभासद आह़े तसेच 18 सदस्यांची कार्यकारिणी आह़े या कार्यकारिणीमुळे वाचनालयाला ऊर्जा मिळाली आह़े कार्यकारिणीकडून वाचनालयाच्या विकासासाठी वर्षभरात विविध उपक्रमांमधून निधीसाठी प्रयत्न तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत़े
 वाचनायात विद्याथ्र्यासाठी स्वतंत्र अभ्यासिका कक्ष आह़े  सकाळी 7़30 ते रात्री 10 वाजेर्पयत जिल्हाभरातील विविध गावांमधील विद्यार्थी याठिकाणी अभ्यासिकेचा लाभ घेतात़  यातून सी.ए., पोलीस, विक्रीकर निरीक्षक या पदावर विद्यार्थी पोहचले आहेत.
व.वा.वाचनकट्टा, अक्षरगप्पांमुळे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन
व़वा़वाचनालयाने वाचन चळवळीला प्रोत्साहन मिळावे म्हणून व़वा़कट्टा या उपक्रमाला सुरुवात केली़ प्रत्येक महिन्याच्या दुस:या रविवारी याप्रमाणे गेल्या सात वर्षापासून हा कट्टा नियमित सुरू आह़े विद्यार्थी,  साहित्यिक व वाचक एकत्र येतात़ पुस्तक, साहित्य क्षेत्रातील घटना यावर याठिकाणी दीड ते दोन तासार्पयत चर्चा रंगते.
समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे साहित्य कट्टा
समाज चिंतामणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन वर्षापासून व़वा़कट्टा या उपक्रमाच्याच्या पाश्र्वभूमीवर साहित्य कट्टा उपक्रम घेतला जात आह़े शिक्षक कट्टा असे नाव असलेल्या उपक्रमाचे कालांतराने साहित्य कट्टा असे नाव ठेवण्यात आल़े
रामदास मंदिरात वाचन कट्टा
नवीन पिढीत वाचन संस्कृती रूजावी, यासाठी विनोद देशमुख यांच्यातर्फे वार्ड क्र 32 मध्ये रामदास मंदिर येथे नुकताच वाचनकट्टा हा उपक्रम सुरू करण्यात आला आह़े दर शनिवारी याठिकाणी एका पुस्तकाचे सामूहिक पुस्तक वाचन केले जात़े यामुळे लहान मुले, महिला, तरुण यांना वाचनासाठी व्यासपीठ मिळाले आह़े नागरिकांचा या कट्टय़ाला चांगलाच प्रतिसाद मिळत आह़े
मु़ज़ेमहाविद्यालयात हायटेक ग्रंथालय
मू.ज़ेमहाविद्यालयात ग्रंथालये डिजिटल झाली असून विद्याथ्र्यासाठी ई-वाचनाची सोय उपलब्ध करून दिली आह़े मु़ज़े महाविद्यालयात ग्रंथालयाची स्वतंत्र अशी दुमजली इमारत आह़े या वाचनालयात  1 लाख 52 हजार 17 एवढी ग्रंथसंपदा आह़े महाविद्यालयाने आधुनिकतेची कास धरत विद्याथ्र्यासाठी डिजिटल लर्निग रिसोर्स  सेंटर सुरू केले आह़े यात एकावेळी 30 विद्यार्थी संगणकावर बसून ई पुस्तके, व्हिडीओ बघू शकतात़ विद्याथ्र्याना पुस्तक शोधण्यासाठी ऑनलाईन पब्लिक असेस (ओपॅक) ही ऑनलाईन प्रणाली अस्तित्वात आह़े त्यावर कपाटात पुस्तके न शोधता, संगणकावर हवे ते पुस्तक शोधून त्याची मागणी करू शकतात़ सद्यस्थितीत 6300 जनरल व 1 लाख 38 हजार 500 ई पुस्तके विद्याथ्र्यासाठी उपलब्ध आहेत़ तसेच लायब्ररी पोर्टलवर पीएचडी प्रबंध, एमफील प्रबंध, बडिंग रिसर्च व हस्तलिखिते यांच्या डिजिटल कॉपी वाचण्याची सोय आह़े प्रज्ञाचक्षूंनाही मू.ज़ेमहाविद्यालयातील ग्रंथालयातील पुस्तकांचा लाभ व्हावा म्हणून त्यांच्यासाठी ड्रीमी आईज रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज या नावाने केंद्र सुरू आह़े यात प्रज्ञाचक्षूंना संगणकांचा वापर कसा करावा हे शिकविण्यासाठी प्रज्ञाचक्षू शिक्षक नियुक्त आह़े

Web Title: Reading culture of Jalgaon libraries is growing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.