जळगावात पेट्रोलचे दर 81.18 रुपये प्रति लिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:53 PM2018-01-24T13:53:41+5:302018-01-24T13:53:48+5:30

करामुळे मोठी वाढ

The rate of petrol was Rs 81.18 per liter | जळगावात पेट्रोलचे दर 81.18 रुपये प्रति लिटर

जळगावात पेट्रोलचे दर 81.18 रुपये प्रति लिटर

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरेल 70 डॉलर होण्यासह केंद्र व राज्य सरकारच्या करांमुळे पेट्रोल-डिङोलच्या दरात भरमसाट वाढ सुरूच असून मंगळवारी यात आणखी भर पडून  पेट्रोल प्रति लिटर 80 रुपयांच्या पुढे गेले  तर डिङोलही 67 रुपयांच्या पुढे गेल्याने महागाई वाढण्याची चिन्हे आहेत. जळगावात 23 रोजी पेट्रोलचा दर 81.18  रुपये प्रति लिटर तर डिङोल 67.34 रुपये प्रति लिटर एवढा झाला आहे.
इंधनाच्या दरांवरील नियंत्रण काढल्यानंतर वर्षभरापासून पेट्रोल-डिङोलचे दर रोज बदलले जात आहेत. मात्र हे कमी न होता दररोज  वाढतच असून, मागील दोन महिन्यांत लिटरमागे तब्बल साडेचार रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या डॉलर कमकुवत झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार कच्च्या तेलाकडे वळले आहेत.  याचा परिणाम म्हणून मागणी वाढल्याने त्याचे भाव वाढत आहे. 

करामुळे मोठी वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव तर वाढतच आहे, सोबतच केंद्र व राज्य सरकारचे कर यामुळे दर वाढत आहे. या सोबतच इतर राज्यात सेस नसला तरी महाराष्ट्रात तो लागत असल्याने राज्यात हे भाव जास्तच असतात. इंधनासाठी सेस हा प्रति लिटर लागत असल्याने त्याचा मोठा परिणाम होतो, असे जळगाव जिल्हा पेट्रोल डिङोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश चौबे तसेच सदस्य लक्ष्मीकांत चौधरी यांनी सांगितले. 

 

Web Title: The rate of petrol was Rs 81.18 per liter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.