वरणगावात खडसे गटाला धक्का, भाजपा विरुद्ध भाजपा, महाजन गटाचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 04:41 AM2017-11-29T04:41:11+5:302017-11-29T04:41:50+5:30

: वरणगाव नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी मंगळवारी भाजपा विरुद्ध भाजपा अशी लढत झाली. यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गटाचे सुनील रमेश काळे निवडून आल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे

 Pushing at Khadse Group in Varanga Naga, BJP against BJP, Mahajan climax victory | वरणगावात खडसे गटाला धक्का, भाजपा विरुद्ध भाजपा, महाजन गटाचा विजय

वरणगावात खडसे गटाला धक्का, भाजपा विरुद्ध भाजपा, महाजन गटाचा विजय

Next

भुसावळ (जि. जळगाव) : वरणगाव नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी मंगळवारी भाजपा विरुद्ध भाजपा अशी लढत झाली. यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गटाचे सुनील रमेश काळे निवडून आल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या गटाला धक्का बसला आहे.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकरिता मंगळवारी पालिका सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष पदासाठी महाजन गटाचे सुनील काळे व खडसे गटाच्या रोहिणी जावळे यांच्यात लढत झाली. पालिकेतील १८पैकी ११ सदस्यांनी काळे यांना तर जावळे यांना ७ सदस्यांनी मतदान केले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शे. अखलाख शे. युसूफ यांना ११ मते मिळाली. वरणगाव पालिकेत १८ सदस्य आहेत. यात भाजपा ८, राष्टÑवादी काँग्रेस ५, अपक्ष ४ आणि शिवसेना १ असे पक्षीय बलाबल आहे. या निकालाने भाजपा विरुद्ध भाजपाची चांगलीच चर्चा रंगली़
 

 

Web Title:  Pushing at Khadse Group in Varanga Naga, BJP against BJP, Mahajan climax victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा