पंजाबच्या ट्रक चालकाने परस्पर विकली जळगावच्या व्यापा-याची पपई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 09:46 PM2018-02-08T21:46:31+5:302018-02-08T21:48:47+5:30

ट्रान्सपार्ट मालकाकडे बाकी असलेले २० हजार रुपये मिळत नसल्याने ट्रक चालकाने व्यापाºयाचीच एक लाख रुपये किमतीची पपई परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ट्रक चालक सुखदर्शनसिंग रणजीतसिंग (रा.तमोट, ता.पायळ जि.लुधियाना, पंजाब) व ट्रान्सपोर्ट मालक मनोज गुप्ता याच्याविरुध्द गुरुवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Punjab's truck driver sold the papaya of the business of Jalgaon | पंजाबच्या ट्रक चालकाने परस्पर विकली जळगावच्या व्यापा-याची पपई

पंजाबच्या ट्रक चालकाने परस्पर विकली जळगावच्या व्यापा-याची पपई

Next
ठळक मुद्दे एक लाखाची फसवणूक  ट्रान्सपोर्ट मालकाकडे २० हजार रुपये असल्याची बतावणीचालक व ट्रान्सपोर्ट मालकाविरुध्द गुन्हा

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,८ : ट्रान्सपार्ट मालकाकडे बाकी असलेले २० हजार रुपये मिळत नसल्याने ट्रक चालकाने व्यापा-याचीच एक लाख रुपये किमतीची पपई परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ट्रक चालक सुखदर्शनसिंग रणजीतसिंग (रा.तमोट, ता.पायळ जि.लुधियाना, पंजाब) व ट्रान्सपोर्ट मालक मनोज गुप्ता याच्याविरुध्द गुरुवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, महम्मद इरफान महम्मद इसाक व महम्मद इबा महम्मद इसाक यांचे खान्देश पपिता सप्लायर्स नावाचे दुकान आहे. शेतकºयांकडून पपई विकत घेऊन ती कमिशनवर पंजाब राज्यात पाठविली जाते.जवखेडा, ता.धरणगाव येथील शेतकरी राजेंद्र बाळासाहेब पाटील यांच्या शेतातील पपई घेण्यासाठी जय मातादी रोड लाईन्सचा ट्रक (क्र.पी.बी.११ ए.एच.८०७५) १८ जानेवारी २०१८ रोजी पाठविला होता. तेथून पपई भरल्यानंतर रात्री हा ट्रक घेऊन चालक सुखदर्शनसिंग रणजीतसिंग राधे राधे फ्रुट कंपनी (लुधियाना) यांच्याकडे पाठविला. हा ट्रक २१ जानेवारीपर्यंत लुधियाना येथे पोहचणे अपेक्षित असताना तेथे पोहचलाच नाही.
मालकानेच दिला पपई विकण्याचा सल्ला
लुधियाना येथील बिट्टू शेठ यांना ट्रकबाबत विचारणा केली असता त्यांनी ट्रक पोहचलाच नसल्याचे सांगितले. त्यानंतर महम्मद इबा यांनी चालकाशी संपर्क साधला असता त्याने हा ट्रक मी माझ्या गावाला आणला आहे. जय मातादी रोड लाईन्स (रा.जळगाव) यांच्याकडे माझे २० हजार रुपये आहेत, ते काढून द्या असे सांगितले. त्यावर हा तुमची वैयक्तिक व्यवहार आहे, त्याच्याशी आमचा संबंध नाही असे सांगून माल ठरलेल्या ठिकाणी पोहचविण्याचे सांगितले. परंतु तरीही ट्रक व पपई ठरल्या ठिकाणी पोहचलीच नाही. २७ रोजी चालकाने स्वत:च फोन करुन सांगितले की, जय मातादी ट्रान्सपोर्टचे मालक मनोज गुप्ता यांच्याकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी पपई विक्री करुन तुझे पैसे घे असे सांगितले, त्यामुळे मी पपई विक्री केली आहे असे कळविले. त्यामुळे महम्मद इरफान यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

Web Title: Punjab's truck driver sold the papaya of the business of Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.