जामनेर बायपासच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने गती द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 05:51 PM2018-01-09T17:51:02+5:302018-01-09T17:54:16+5:30

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घालण्याचे केली नागरिकांनी मागणी

The public works department should speed up Jamnar bypass work | जामनेर बायपासच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने गती द्यावी

जामनेर बायपासच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने गती द्यावी

Next
ठळक मुद्देप्रस्तावित बायपास पुरा भागातून निघुन बोदवड पुलाजवळ निघणारसार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कामाला सुरुवात करावीभुसावळहून औरंगाबाद जाण्यासाठी जामनेरमार्गे गेल्यास सुमारे २५ किमी अंतराचा फेरा कमी

आॅनलाईन लोकमत
जामनेर,दि.९ : भुसावळहून औरंगाबादकडे जाणारा राज्यमार्ग जामनेर शहराच्या मध्यवस्तीतून जात असल्याने अवजड वाहनांची वाहतुक वाढली आहे. परिणामी शहराच्या वाहतुक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणुन हा मार्ग शहराबाहेरुन काढण्यात येणार असल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी यापूर्वीच सांगितले. या कामास तत्काळ सुरुवात करुन गती मिळावी अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.
भुसावळहून औरंगाबाद जाण्यासाठी जळगावमार्गे जाण्याएवेजी जामनेरमार्गे गेल्यास सुमारे २५ किमी अंतर वाचते. त्यामुळे वाहनधारक या मार्गाने जाणे पसंत करतात. इंदूर येथून पुणे, औरंगाबाद अथवा जालनामार्गे हैद्राबाद जाणारी वाहने जामनेरहून जातात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते.
शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाºया या रस्त्यावर शाळा, महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय व शासकीय कार्यालय आहेत. अवजड वाहनांची वर्दळ व शहरातील अंतर्गत वाहतुकीमुळे सतत वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने हा मार्ग शहराबाहेरुन काढणार असल्याचे महाजन यांनी यापूर्वी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. हा प्रस्तावित बायपास पुरा भागातुन निघुन बोदवड पुलाजवळ निघेल.
बायपास रस्ता पुढे मुंबई नागपूर मागार्ला मिळणार असल्याने या मार्गावरील वाहने देखील बाहेरुनच भुसावळकडे वळविणे शक्य आहे. सार्वजनीक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देवुन या कामास तातडीने सुरुवात करावी अशी मागणी होत आहे.

 बायपास रस्त्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. येत्या तीन महिन्यात हे काम पुर्ण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल.
जी. एस. पाटील, उपविभागीय अभियंता, सा.बां उपविभाग,जामनेर.

Web Title: The public works department should speed up Jamnar bypass work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.