जळगावातील सरकारी वकील राखी पाटील मृत्यूप्रकरणी भुसावळच्या डॉक्टरांचे घेतले जबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 10:12 PM2019-01-17T22:12:09+5:302019-01-17T22:12:41+5:30

वाहन पोलिसांनी केले जप्त

Public prosecutor of Jalgaon Rakhi Patil's statement about the death of Bhusawal's doctor | जळगावातील सरकारी वकील राखी पाटील मृत्यूप्रकरणी भुसावळच्या डॉक्टरांचे घेतले जबाब

जळगावातील सरकारी वकील राखी पाटील मृत्यूप्रकरणी भुसावळच्या डॉक्टरांचे घेतले जबाब

Next

जामनेर : जळगाव न्यायालयातील सरकारी वकील अ‍ॅड. राखी पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी जामनेर पोलिसांनी गुरुवारी भुसावळ येथील खाजगी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचे जवाब नोंदविले.
मयत अ‍ॅड. राखी पाटील यांचा मृतदेह घेऊन संशयीत आरोपी असलेले त्यांचे पती डॉ.भरत पाटील यांनी भुसावळ येथील चार खाजगी दवाखान्यात गेले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी या चार दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचे जबाब नोंदवून घेतले.
संशयीत डॉ.भरत पाटील यांनी ज्या वाहनातून राखी पाटील यांचा मृतदेह भुसावळ, बेलखेड येथे नेला ते वाहन पोलिसांनी जप्त केले असून वाहन चालकाचे जबाब नोंदविले आहे.
दरम्यान, डॉ.पाटील व राखी पाटील यांचे मोबाईलवरील संभाषण तपासले जात असून यातून महत्त्वाची माहिती व पुरावे हाती लागण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Public prosecutor of Jalgaon Rakhi Patil's statement about the death of Bhusawal's doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.