कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत चाळीसगावाला आज कृषि महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 07:00 PM2018-04-06T19:00:56+5:302018-04-06T19:00:56+5:30

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन: शासकीय योजनांची जत्राही

In the presence of Agriculture Ministers, today, the Krishi Mahotsav is at Chalisgaon | कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत चाळीसगावाला आज कृषि महोत्सव

कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत चाळीसगावाला आज कृषि महोत्सव

Next
ठळक मुद्देसप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनपर कीर्तन१५२ लोककल्याणकारी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नएकाच छताखाली कृषि महोत्सव, शासकीय योजनांची जत्रा आणि राज्यस्तरीय ४३ वे विज्ञान प्रदर्शन

चाळीसगाव, दि. ६ : चाळीसगाव येथे चार दिवस चालणा-या कृषि महोत्सवाची तयारी शुक्रवारी पुर्ण झाली. उद्घाटन शनिवारी सकाळी ११ वाजता राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते होत आहे. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री सदाभाऊ खोत असतील. ९ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे भेट देणार आहेत.
खान्देशात प्रथमच एकाच छताखाली कृषि महोत्सव, शासकीय योजनांची जत्रा आणि राज्यस्तरीय ४३ वे विज्ञान प्रदर्शन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मी नगरातील सिताराम पहेलवान यांच्या दोन एकर परिसरातील मळ्याच्या मोकळ्या जागेवर ७ ते १० असे चार दिवस हा महोत्सव होत आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत राज्यभरातील बहुसंख्य विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शन शिक्षक विज्ञान प्रकल्प घेऊन प्रदर्शनस्थळी दाखल झाले आहेत.
महोत्सवात कृषि मार्गदर्शन, शासकीय योजनांची जत्रा आणि विज्ञान प्रदर्शन याबरोबरच व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रशस्त व्यासपिठाची निर्मिती करण्यात आली आहे.
१५२ लोककल्याणकारी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी कृषी व महसूल विभागाच्या हा उपक्रम राबविला जात आहे. ४० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याचबरोबर महालॅबतर्फे रक्त तपासणी विनामुल्य करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेती करतांना विज्ञानाचा वापर करुन उत्पन्न कसे वाढवावे याविषयी प्रात्यक्षीक दाखविण्यात येणार आहे. सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनपर किर्तनही होईल. सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: In the presence of Agriculture Ministers, today, the Krishi Mahotsav is at Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.