जळगावात पसंती क्रमांकांनी ‘आरटीओ’ मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 01:36 PM2018-04-10T13:36:36+5:302018-04-10T13:36:36+5:30

विक्रमी महसूल

Preferred numbers 'RTO' in Jalgaon | जळगावात पसंती क्रमांकांनी ‘आरटीओ’ मालामाल

जळगावात पसंती क्रमांकांनी ‘आरटीओ’ मालामाल

Next
ठळक मुद्दे२ कोटी ४९ लाख ६३ हजार मिळालेराज्यात आघाडीवर

सुनील पाटील / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १० - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने यंदा शासनाला रेकॉर्ड ब्रेक असा महसूल दिला आहे. वाहन करासदंर्भात ७ हजार २०० कोटी इतका अर्थसंकल्पीय अंदाज असताना प्रत्यक्षात आरटीओने ८ हजार २२५.२५ कोटी रुपयांचा महसूल शासनाला मिळवून दिला आहे. त्यात जळगाव जिल्ह्याने १२७ कोटी ४० लाखांचा महसूल दिला आहे. त्यात पसंती क्रमाकांनी २ कोटी ४९ लाख ६३ हजार ५०१ इतका महसूल तिजोरीत भरला आहे. ही राज्यातील विक्रमी वसुली आहे.
राज्य शासनाने जळगाव आरटीओ २०१७-१८ या अर्थिक वर्षासाठी ११२ कोटी ५९ लाखांचे उद्दिष्ट दिले होते. त्यात स्थानिक कार्यालयाने तब्बल १२७ कोटी ४० लाखांचा महसूल मिळवून दिला. ११३.१६ टक्के जास्तीचा महसूल मिळाला आहे. २०१६-२७ मध्ये ९३ कोटी १७ लाखांचे उद्दिष्ट होते, तेव्हाही आरटीओने १०२ कोटी ४९ लाखांची पूर्तता केली होती.
अर्थमंत्र्यांनी घेतली दखल
आरटीओकडून मिळालेल्या विक्रमी महसूलाबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक व जिल्हास्तरावरील आरटीओंना पत्र पाठवून कौतुक केले आहे. मार्च २०१८ अखेर मुख्य करांची जमेची स्थिती बघितली तर वाहनांवरील कराच्या संदर्भात ७ हजार २०० इतका अर्थसंकल्पीय अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात जळगाव आरटीओ कार्यालर्याने ८ हजार २२४.३५ कोटी रुपयांची विक्रमी वसुली केल्याने शासनाच्या तिजोरीत मोठी भर केली आहे. यामुळे तिजोरीत मोठी भर पडणार असल्याचे म्हटले जात आहे.
हौसेला मोल नाही... हौसेला मोल नाही असे आपण म्हणतो.. हे सूत्र वाहनांच्या पसंती क्रमांकाच्या बाबतीत तंतोतंत लागू झाले आहे. हवा तो किंवा आकर्षक क्रमांक मिळविण्यासाठी वाहनधारकांनी आरटीओच्या तिजोरीत २ कोटी ४९ लाख ६३ हजार ५०१ रुपये भरले आहेत. आकर्षक क्रमांक घेणाऱ्यांमध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तर आहेतच, त्याशिवाय सरकारी अधिकारी व कर्मचाºयांचीही कमी नाही. यात वाढदिवस, लग्नाची तारीख, क्रमांकातून मुलाचे किंवा देवाचे नाव, एका वाहनाचा एक क्रमांक असेल तर दुसºया वाहनाचाही तोच क्रमांक असावा अशी धारणा असलेले वाहनधारकांचा समावेश आहे. जळगावच्या इतिहासात प्रथमच इतकी रक्कम वसूल झाल्याची माहिती आरटीओचे वाहनकर निरीक्षक चंद्रशेखर इंगळे यांनी दिली.
वाळू वाहतूकदारांकडून ६० लाख
अवैध तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाळू वाहतूक करणाºया १९५ वाहनांवर आरटीओने कारवाई केली. त्यांच्याकडून ६० लाख २३ हजार ४५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय अवैध प्रवासी वाहतूक करणाºया ६ हजार ३५ वाहनांची तपासणी केली असता त्यात ९८८ वाहने दोषी आढळून आली. त्यांच्याकडून ३३ लाख ३४ हजारांचा दंड वसूल झाला आहे. कर्कश हॉर्न, काळी फिल्म, रिफ्लेक्टर, हेल्मेट यासह विविध प्रकारच्या तपासणीत ७ हजार ४३५ वाहनांवर कारवाई झालेली आहे.

जळगाव कार्यालयाने उद्दिष्टापेक्षा जास्त महसूल शासनाला मिळवून दिला आहे. पसंती क्रमांकाच्या बाबतीत तर विक्रमी वसुली झालेली आहे. वाहन नोंदणी व दंडाच्या माध्यमातून मोठा महसूल मिळाला आहे. भविष्यात हा आकडा आणखी वाढू शकतो. अधिकारी व कर्मचाºयांच्या मेहनतीमुळे काही प्रमाणात महसूल वाढविता आला आहे.
-जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Preferred numbers 'RTO' in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.