गुंडगिरी ठेचण्यात पोलीस अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:13 PM2019-02-16T23:13:14+5:302019-02-16T23:14:53+5:30

पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अवैध धंद्याचा बिमोड करण्यासह ‘खाकी’ला शिस्त लावण्याचे केलेले प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून शहरात विशिष्ट गटाकडून गुंडगिरी वाढत चालली आहे. जातीय तणावाच्या घटनांचा उदय होत आहे. जळगाव शहरातील आर.आर.विद्यालयाच्या दोन शिक्षकांवर एकाच महिन्याच दोन वेळा हल्ले झाले. हल्ला करणारे कोण?, त्यामागे कारण काय? हे स्पष्ट झालेले असतानाही पोलिसांकडून या गुंडगिरी करणा-या टवाळखोरांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

Police failure to hoodle bullying | गुंडगिरी ठेचण्यात पोलीस अपयशी

गुंडगिरी ठेचण्यात पोलीस अपयशी

googlenewsNext
ठळक मुद्देविश्लेषणविशिष्ट गटाकडून गुंडगिरी वाढत चालली आहे काही ठिकाणी तर सीसीटीव्ही कॅमे-यात हे गुंड कैद झाले

सुनील पाटील
जळगाव : पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अवैध धंद्याचा बिमोड करण्यासह ‘खाकी’ला शिस्त लावण्याचे केलेले प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून शहरात विशिष्ट गटाकडून गुंडगिरी वाढत चालली आहे. जातीय तणावाच्या घटनांचा उदय होत आहे. जळगाव शहरातील आर.आर.विद्यालयाच्या दोन शिक्षकांवर एकाच महिन्याच दोन वेळा हल्ले झाले. हल्ला करणारे कोण?, त्यामागे कारण काय? हे स्पष्ट झालेले असतानाही पोलिसांकडून या गुंडगिरी करणा-या टवाळखोरांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. एका विशिष्ट गटाकडून शहरात दादागिरी वाढली आहे. हल्ला केल्यानंतर या टवाळखोरांकडून त्यांच्या गृपचे नाव सांगितले जात आहे. काही ठिकाणी तर सीसीटीव्ही कॅमे-यात हे गुंड कैद झाले आहेत. आर.आर.विद्यालयाच्या दोन शिक्षकांवर हल्ला केल्यानंतर या टवाळखोरांनी बी.जे.मार्केट परिसरातील एका हॉटेलवर तरुणाला घेरुन मारहाण झाली होती. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने हे टवाळखोर पळून गेले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही, मात्र त्याआधी याच गृपच्या टवाळखोरांनी आर.आर.विद्यालयाच्या शिक्षकावर हल्ला केला होता. हा गृप शनी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्याला आहे. या गृपमधील टवाळखोर १८ ते २५ वयोगटातील आहेत. यांना वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात या टवाळखोरांकडून मोठी घटना घडली तर नवल वाटू नये. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी नुसते अवैध धंदे हेच टार्गेट न ठेवता गुंडगिरीचा नायनाट करण्यासह  जातीय तणावाच्या घटनांवरही लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. शहरात वाढणारी गुंडगिरी रोखणे हे अत्यंत महत्वाचे आहे, अन्यथा त्याचे परिणाम वेगळे भोगावे लागतील,हे काही घटनांवरुन सिध्द झाले आहे.

Web Title: Police failure to hoodle bullying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.