विदेशातील पेंडखजूर भुसावळच्या बाजारपेठेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 02:52 PM2019-05-11T14:52:34+5:302019-05-11T14:53:53+5:30

मुस्लीम समाज बांधवांच्या पवित्र रमजानच्या महिन्याला ७ मेपासून सुरुवात झाली आहे. रमजान महिन्यातील प्रत्येक रोजा सोडताना खजूर खाण्याची पूर्वा पार प्रथा आहे. या पार्श्वभूमीवर विदेशातून भुसावळच्या बाजारपेठेत विविध जातीच्या चांगल्या प्रतीचे पेंडखजूर दाखल झालेले आहेत.

Pendjacorse overseas market in the market | विदेशातील पेंडखजूर भुसावळच्या बाजारपेठेत

विदेशातील पेंडखजूर भुसावळच्या बाजारपेठेत

Next
ठळक मुद्देपवित्र रमजान पर्वात ग्राहकांकडून होतेय मागणीइराण, सौदी अरेबियातून खजूर झाली आयातरोजा सोडण्यासाठी होतो वापर

वासेफ पटेल
भुसावळ , जि.जळगाव : मुस्लीम समाज बांधवांच्या पवित्र रमजानच्या महिन्याला ७ मेपासून सुरुवात झाली आहे. रमजान महिन्यातील प्रत्येक रोजा सोडताना खजूर खाण्याची पूर्वा पार प्रथा आहे. या पार्श्वभूमीवर विदेशातून भुसावळच्या बाजारपेठेत विविध जातीच्या चांगल्या प्रतीचे पेंडखजूर दाखल झालेले आहेत.
भुसावळच्या मुस्लीम बहुल जाममोहल्ला, खडकारोड, अमरदीप टॉकीज परिसरात आणि काही मोठ्या व्यावसायिकांकडे अशा विदेशातील खजूर विक्रीसाठी आणि खास करून पवित्र रोजा सोडण्यासाठी मागविण्यात आल्या आहेत.
दिवसभर म्हणजे सूर्योदयाच्या आधीपासून ते सूर्यास्तापर्यंत रोजा ठेवणारे समाज बांधव, महिला, लहान मूल, मुली अन्नपाण्याचा एक थेंबसुद्धा घेत नाहीत. यामुळे दिवसभरात जो अशक्तपणा आलेला असतो तो दूर व्हावा याकरिता पेंड खजूरचे सेवन करून रमजानचा रोजा सोडण्याची आधीपासूनची प्रथा आहे. पेंडखजूरचे सेवन केल्याने शरीराचा अशक्तपणा दूर होतो. यासाठी रोजा सोडण्यासाठी भुसावळच्या बाजारपेठेत १५ ते २० प्रकारच्या पेंडखजूर विदेशातून मागविण्यात आल्या आहेत. त्यांना या काळात मोठी मागणी मिळत आहे.
भुसावळ शहरातील मुस्लीम बहूल अमरदीप चौकामध्ये पवित्र रमजानच्या काळात रोज सायंकाळी पाच ते रोजा इफ्तारपर्यंत दीड तासांमध्ये पेंडखजूर शिवाय रोजा इप्तारीसाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होते.
या ठिकाणी हा रस्ता बॅरिकेट्स लावून बंद करण्यात येतो.
खजूरच्या किमतीत वाढ
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेंडखजूरच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. साधी खजूर प्रतिकिलो ८० रुपये, खनिजी प्रतिकिलो २०० रुपये, इराणी खजूर १२० ते १५० रुपये किलो, सलार २६० प्रतिकिलो, बाहमन ३०० रुपये प्रति किलो, ब्लॅक सायर २४० ते ३०० रुपये किलो, बरारी १४० ते १९० रुपये किलो, केमिया २३० ते ३०० रुपये किलोपर्यंत, रसगुल्ला २४० रुपये किलो, रब्बी ३०० रुपये किलो, मगरूम ५०० रुपये किलो, कलमी ८०० रुपये किलो. याप्रमाणे खजूर भुसावळच्या बाजारात विकली जात आहे.
पवित्र रमजान महिन्यासाठी भुसावळच्या व्यापाºयांनी मागविलेली चांगल्या दर्जाची खजूर ही अरब देश इराण, सौदी अरेबिया येथून मागविण्यात आली असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली. भुसावळ शहरातील खास करून अमरदीप चौक आणि सुभाष पोलीस चौकी चौक, रजा टॉवर परिसरात रमजान काळात खजूर आणि अन्य खाद्यपदार्थ घेण्यासाठी समाजबांधवांची मोठी पसंती असते.


 

Web Title: Pendjacorse overseas market in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.