जळगावात धुम्रपान करणाऱ्या ६३ जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:16 PM2018-05-18T14:16:04+5:302018-05-18T14:16:04+5:30

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे ६३ जणांना चांगलेच महागात पडले आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे गुरुवारी सार्वजनिक धुम्रपान करणाºयांविरुध्द कारवाईची मोहीम राबविण्यात आली.

Penalty for 63 people smoking in Jalgaon | जळगावात धुम्रपान करणाऱ्या ६३ जणांना दंड

जळगावात धुम्रपान करणाऱ्या ६३ जणांना दंड

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा पोलीस दलातर्फे कारवाई१२ हजार ६०० रुपयांचा दंड वसुलशाळा, महाविद्यालय, बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात कारवाई

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१८ : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे ६३ जणांना चांगलेच महागात पडले आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे गुरुवारी सार्वजनिक धुम्रपान करणा-यांविरुध्द कारवाईची मोहीम राबविण्यात आली. शहरात दिवसभर विविध ठिकाणी ६३ जणांवर कोटपा कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १२ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या आदेशाने शहर वाहतूक शाखा व शहरातील पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ही कारवाई केली. कोटपा कायद्याचे उल्लंघन करणा-यांना कमीतकमी २०० रुपये दंड, तसेच पाच वर्ष कारावास व ५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
दरम्यान, ही मोहीम तीव्र करण्यात येणार असून शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

Web Title: Penalty for 63 people smoking in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.