थकबाकीदारांच्या याद्या चौकाचौकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:43 PM2019-01-17T12:43:18+5:302019-01-17T12:43:28+5:30

पंधरा दिवसांची मुदत

 Outlaw list | थकबाकीदारांच्या याद्या चौकाचौकात

थकबाकीदारांच्या याद्या चौकाचौकात

Next
ठळक मुद्देअन्यथा जप्तीची कारवाई, ४०० बडे थकबाकीदार रडारवर



जळगाव : मनपा मालमत्ताकराची रक्कम थकीत असलेल्या ४०० बड्या थकबाकीदारांच्या नावांची यादी बुधवारी मनपाकडून चौकाचौकात प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रभागनिहाय चार याद्यांचे बॅनर शहरातील अनेक भागांमध्ये लावण्यात आले असून, सर्व थकबाकीदारांनी आपल्याकडील मालमत्ताकराची थकीत रक्कम पंधरा दिवसाच्या आत भरण्याचे आदेश मनपा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
मनपाची डिसेंबर अखेरपर्यंत ५५ टक्के वसुली झाली असून, उर्वरित वसुली करण्यासाठी मनपाकडे केवळ तीन महिन्यांचा काळ शिल्लक असल्याने जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी मनपाकडून विशेष प्रयत्न होत आहेत. ज्या थकबाकीदारांकडे वर्षभरापासून लाखापेक्षा अधिक थकबाकी आहे.
अशांचीच यादी जाहीर करण्यात आलेली आहे. चारही प्रभागातून प्रत्येकी १०० थकबाकीदारांचे नावे सार्वजनिक करण्यात आले आहे.
मोठ्या थकबाकीदारांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, या पंधरा दिवसात रक्कम न भरल्यास मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे.
तसेच शहरातील ४ हजार ५०० थकबाकीदारांना देखील जप्तीच्या नोटीस बजावण्यात आल्या असून, त्यांना देखील पंधरा दिवसांची मूदत देण्यात आली आहे.
दरम्यान, मनपा प्रशासनाच्या या अजब फंड्याची शहरात जोरदार चर्चा असून कारवाईच्या भीतीमुळे थकबाकीदारांचेही धाबे दणाणले आहे. या फलकामुळे किती वसुली होते, हे येणारा काळच सांगले.
बाकी भरणाऱ्यांना मोफत नळ कनेक्शन
अमृत अंतर्गत ज्या भागांमध्ये पाणी पुरवठा योजनेचे काम झाले आहे. अशा भागात पाणी पुरवठ्याचे नळ कनेक्शन मनपाकडून दिले जात आहे. दरम्यान, ज्या नागरिकांनी थकबाकी रक्कम भरली आहे अशांना मनपाकडून मोफत नळ कनेक्शन दिले जाणार असल्याची माहिती मनपाचे प्रकल्प अभियंता योगेश बोरोले यांनी दिली आहे. तसेच ज्या थकबाकीदारांनी थकीत रक्कम भरली नाही अशा नागरिकांना नळ कनेक्शन दिले जाणार नसल्याची माहितीही बोरोले यांनी दिली.

Web Title:  Outlaw list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.