खडसे परिवारातील उमेदवाराच्या प्रचारास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:11 AM2019-02-18T11:11:49+5:302019-02-18T11:12:52+5:30

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या बैठकीत ठराव

Opposition for campaigning for Khadse family | खडसे परिवारातील उमेदवाराच्या प्रचारास विरोध

खडसे परिवारातील उमेदवाराच्या प्रचारास विरोध

googlenewsNext
ठळक मुद्देभुसावळ येथे झाली बैठक



भुसावळ / जळगाव: २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे नेते एकनाथराव खडसे यांनी युती तोडल्यामुळे रावेर लोकसभा मतदार संघात खडसे किंवा त्यांच्या परिवारातील कोणीही युतीचा उमेदवार असला तरी शिवसेना त्याचा प्रचार करणार नाही , असा ठराव रावेर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी रविवारी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित बैठकीत केला.
दरम्यान, यासंदर्भात २१ रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही देणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले आहे. बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या बाबत चर्चा करीत असतांना सर्वांच्या वतीने भाजपावर रोष व्यक्त करण्यात आला आणि रावेर लोकसभा मतदार संघ शिवसेनेसाठी सोडण्यात यावा असाही ठराव यावेळी करण्यात आला.
युती झाल्यापासून ही जागा भाजपला सुटलेली आहे. त्यामुळे या मतदार संघातील शिवसेनेची वाढ खुंटली आहे. शिवाय भाजपच्या खासदार रक्षा खडसे या आतापर्यंत शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाºयाला विश्वासात न घेता निधी खर्च करतात. त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून रावेर लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेकरीता सोडण्यात यावी, अशीही मागणी होत आहे.तसेच युती झालीच व भाजपला जागा सोडल्यास व खडसे कुटुंबियांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असे मत अनेक पदाधिकाºयांनी मांडले. खडसेंनी त्यांच्या जाहीर सभेत अनेक वेळा शिवसेना संपविण्याची भाषा केलेली आहे. नुकत्याच मुक्ताईनगर येथील सहा शिवसैनिकांवर १३ रोजी ३०७ सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले, असा आरोपदेखील बैठकीत करण्यात आला. त्यामुळे रावेर लोकसभा निवडणुकीत खडसे किंवा खडसे कुटुंबीयांस युतीतर्फे उमेदवारी दिल्यास शिवसैनिक युतीचे काम करणार नाही, असे ठाम मत अनेक पदाधिकाºयांनी मांडले.
युती तोडण्याची जाहीर करणाºया एकनाथराव खडसेंकडून सातत्याने शिवसेना व शिवसैनिकांचे खच्चीकरण केले जात आहे. चार दिवसांपूर्वी मुक्ताईनगरात शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिवसैनिकांच्या भावना पक्ष प्रमुखांकडे मांडल्या जातील . ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील.
-चंद्रकांत पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख

Web Title: Opposition for campaigning for Khadse family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.