ऑनलाइन औषधी विक्रीतून जीवाशी खेळ, जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनच्या पदाधिका-यांमधून सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:49 PM2018-01-05T12:49:13+5:302018-01-05T12:51:36+5:30

सहज मिळणा-या औषधींचा गैरवापर

Online drug sale dangeres | ऑनलाइन औषधी विक्रीतून जीवाशी खेळ, जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनच्या पदाधिका-यांमधून सूर

ऑनलाइन औषधी विक्रीतून जीवाशी खेळ, जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनच्या पदाधिका-यांमधून सूर

Next
ठळक मुद्देविक्रेत्यांचे ऑनलाईन जाळे‘सेल्फ मेडिसीन’ धोकेदायक

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 05- ऑनलाईन औषधी विक्री मोठय़ा प्रमाणात वाढली असून त्यास आळा बसणे आवश्यक आहे. थेट औषधी खरेदी करणे म्हणजे व ऑनलाईनवरूनही ती सहज उपलब्ध होण्याचा प्रकार म्हणजे जीवावर बेतणारा ठरू शकतो, असा सूर उमटला. 
जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीच्या निवडीनंतर  पदाधिका:यांचे गुरुवारी ‘लोकमत’ कार्यालयात चर्चासत्र झाले. त्या वेळी हा सूर उमटला. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे, उपाध्यक्ष  बनवारीलाल अग्रवाल, ब्रिजेश जैन, सचिव  अनिल झंवर, अनिरुद्ध सरोदे, कोषाध्यक्ष  श्यामकांत वाणी, संघटन सचिव  संजय तिवारी, जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील, कार्यकारिणी सदस्य सुरेश भंडारी, दिनेश मालू, इरफान सालार, उदय खांदे, विलास नेहेते, धनंजय तळेले, अनिल कोळंबे उपस्थित होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. 

ऑनलाईनवरून कोणालाही सहज मिळते औषधी
ऑनलाईन औषध खरेदी ही एक मोठी समस्या बनली आहे. कोणत्याही डॉक्टरचा संदर्भ देऊन तसेच कोणत्याही चिठ्ठीशिवाय औषधी मागवू शकते. औषध विक्रीच्या दुकानातून औषधी विक्री करताना अन्न व औषध प्रशासनाचा अंकुश असतो. मात्र ऑनलाईनवर तसे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे कोणी कितीही व कोणतीही औषधी सहज मागवू शकते. 

तरुणाई नशेच्या आहारी
ऑनलाईन औषधी सहज मिळू लागल्याने त्याचा मोठय़ा प्रमाणात गैरवापर होत असल्याचेही समोर येत आहे, असे या वेळी विक्रेत्यांनी सांगितले. गर्भपातासाठी लागणा:या कीट औषध विक्रेता देत नाही, मात्र ऑनलाईनवरून ते लगेच मिळते. अशाच प्रकारे लैंगिक भावना उत्तेजित करणारी औषधी, नशेच्या इंजेक्शनच्या आहारी तरुणाई जात असल्याने हा प्रकार जीवघेणा ठरत असल्याचे औषध विक्रेत्यांनी स्पष्ट केले. 

सरकारकडून दाद मिळेना
ऑनलाईन औषधीचे इतक्या मोठय़ा प्रमाणात धोके असल्याने औषधी विक्रेत्यांनी त्यास विरोध दर्शवित ऑनलाईन औषधी विक्री बंद करण्याची मागणी केली. मात्र सरकारकडून यास दाद मिळत नसल्याची खंतही या वेळी व्यक्त करण्यात आली. 

24 सात सेवा
संघटनेच्या सदस्यांसह जिल्ह्यातील जवळपास सर्वच औषध विक्रेते 24 तास सेवा देण्यासाठी तत्पर असतात. या सोबतच मुदत संपलेल्या औषधींची तसेच कोणत्या औषधीमध्ये आवश्यक घटकांचे प्रमाण किती, याची माहिती औषध विक्रेत्यास असते. त्यानुसार तो ग्राहकास योग्य औषधी व योग्य सल्ला देतो. मात्र ऑनलाईनवरून येणा:या औषधीमध्ये कोणते घटक किती आहे, याची माहिती कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे ती धोकादायक ठरू शकते, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. 

‘सेल्फ मेडिसीन’ धोकेदायक
बहुतांश वेळा अनेक जण डॉक्टरांनी पूर्वी लिहून दिलेली औषधी ब:याच दिवसानंतरही घेत असते तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मनाने औषधी  (सेल्फ मेडिसीन) घेत असतात. हा प्रकारही धोकेदायक असल्याचे या वेळी सांगण्यात आले. औषध विक्रेते अशी औषधी देत नाही, मात्र काही ठिकाणी हा प्रकार घडतो, असे मान्य करून तो थांबविणे गरजेचे असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. 

स्पर्धा अशक्य
ऑनलाईन तसेच मोठय़ा मॉल, सुपरशॉपमध्ये औषधी घटक असलेल्या वस्तू विक्रीस उपलब्ध असतात. तेथे  मोठय़ा प्रमाणात खरेदीने त्यांना ते कमी दरात मिळतात व ते त्यावर सूट देतात. मात्र औषधी विक्रेत्यांना ही स्पर्धा शक्य नसल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. 

मुदत संपलेली औषधी ‘ङिारो’ जीएसटीत आणावी
वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) औषधीवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट औषधी विक्रेत्यांनी स्वागत केले. मात्र मुदत संपलेल्या औषधींवरील जीएसटीचा घोळ कायम असल्याने हा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त करीत अशी औषधी ‘ङिारो’ जीएसटीत आणावी अशी मागणी करण्यात आली. 

विक्रेत्यांचे ऑनलाईन जाळे
जळगाव जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी आपल्या खरेदी विक्रीचा व्यवहार, उपलब्ध साठा याची माहिती अद्यायावत ठेवण्यासाठी सर्व व्यवहार संगणीकृत केले आहे. त्यामुळे मुदत संपलेली औषधी, उपलब्ध साठा, बिलांची माहिती केव्हाही उपलब्ध असते. वर्षभरात जिल्ह्यात 100 टक्के हे जाळे पसरणार असल्याचा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. 

संघटनेचा सामाजिक कार्यातही मोठा सहभाग
1984-85मध्ये स्थापना झालेल्या या संघटनेची धुरा विद्यमान अध्यक्ष सुनील भंगाळे हे 2005पासून सांभाळत असून सामाजिक कार्यातही संघटना अग्रेसर आहे. ठिकठिकाणच्या धार्मिक स्थळी जाणा:या दिंडय़ांसोबत औषधी साठा उपलब्ध करून देणे, रक्तदान तसेच आरोग्य शिबिर, गरजू केमिस्टच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च असे उपक्रम राबविण्यासह जिल्ह्यातील 2345 औषध विक्रेत्यांसाठी विविध कार्यशाळा  घेत त्यांना नवनवीन माहिती देऊन व्यवसाय वाढीस मदत केली जाते. संघटनेच्यावतीने गुजरातमधील शबरी कुंभ येथे 13 लाखांची औषधी उपलब्ध करून 40 केमिस्ट बांधवांनी चार दिवस अहोरात्र सेवेसाठी योगदान दिले होते. यासह शीतपेटीचा उपक्रम राबविण्यात येतो. आतार्पयत 50 हजार नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे, असे अनेक सामाजोपयोगी उपक्रम संघटनेच्या वतीने राबविले जातात. 

Web Title: Online drug sale dangeres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.