एसटी चालकास मारहाण करणाऱ्यास एक वर्ष सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 06:39 PM2018-08-10T18:39:00+5:302018-08-10T18:39:17+5:30

चार वर्षांपूर्वी जामनेर येथे घडली होती घटना

One year after the assassin of the ST driver | एसटी चालकास मारहाण करणाऱ्यास एक वर्ष सक्तमजुरी

एसटी चालकास मारहाण करणाऱ्यास एक वर्ष सक्तमजुरी

Next




जामनेर, जि.जळगाव : एसटी चालकास कॅबिनमध्ये घुसून मारहाण करणाºया एकास न्यायालयाने दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व ३ हजार ५०० रुपयांचा दंड, दंड न भरल्यास ८ दिवस सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रकमेतून चालकास १ हजार नुकसान भरपाई द्यावी, असा निर्णय न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांनी गुरुवारी दिला.
घटनेची माहिती अशी, २५ एप्रिल २०१४ रोजी चालक आपल्या ताब्यातील एसटी बस स्थानकातून बाहेर काढत असताना बाजीराव पवार हे दुचाकीने जळगावकडे जात होते. अचानक समोरुन एसटी येत असल्याचे पाहून ते बिचकले व त्यांनी बस थांबवून कॅबिनमध्ये घुसून औरंंगाबाद आगारातील चालक गणेश बोकडे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
बसचालक बोकडे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पवार यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम ३३२, ३५३, ५०६ व १८६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. सरकार पक्षाकडून चालक, वाहक, वैद्यकीय अधीक्षक व साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. सरकार पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. अनिल सारस्वत यांनी बाजू मांडली.

Web Title: One year after the assassin of the ST driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.