भडगावात बंद घरातून लांबविला एक लाखांचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:46 PM2018-11-05T22:46:57+5:302018-11-05T22:48:25+5:30

भोसले पार्क मधील बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करीत अज्ञात चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कमसह सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे एक लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवार ४ रोजी मध्यरात्री झाली.

One lakh rupees from house to house | भडगावात बंद घरातून लांबविला एक लाखांचा ऐवज

भडगावात बंद घरातून लांबविला एक लाखांचा ऐवज

Next
ठळक मुद्देसुमारे एक लाखांचा ऐवज लंपास बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश

भडगाव : भोसले पार्क मधील बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करीत अज्ञात चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कमसह सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे एक लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवार ४ रोजी मध्यरात्री झाली.
याबाबत माहिती अशी की, भगवान नारायण पाटील (रा. भोसले पार्क) हे ८ ते १० दिवसापासुन परिवारासह बाहेरगावी गेलेले होते. बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील ७ हजार रुपये रोख, २ तोळे सोन्याची पोत, सोन्याची अंगठी, सोन्याची चेन, देव्हाऱ्यातील देवाच्या चांदीच्या मूर्ती असे एकुण १ लाखाच्या जवळपास ऐवज लांबविल्याची माहिती भगवान पाटील यांनी दिली. शेजारच्यांनी घटनेची वार्ता कळविल्यावर परिवाराने घर गाठले. तेव्हा सर्व प्रकार लक्षात आल्याचे सांगीतले.

Web Title: One lakh rupees from house to house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.