निवडणुकीतील दारु वापराची माहिती मिळणार एका क्लिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:48 PM2018-07-20T12:48:38+5:302018-07-20T12:51:23+5:30

निवडणूक काळात विक्री होणाऱ्या दारुची माहिती आता अँड्रॉईड मोबाईल व संगणकाच्या एका क्लिकवर दिसणार आहे.

One click will get information about the use of alcohol in elections | निवडणुकीतील दारु वापराची माहिती मिळणार एका क्लिकवर

निवडणुकीतील दारु वापराची माहिती मिळणार एका क्लिकवर

googlenewsNext
ठळक मुद्देउत्पादन शुल्क विभागाने केले अ‍ॅप कार्यान्वितराज्यात प्रथमच तयार झाले आॅनलाईन अ‍ॅपनिवडणुक काळात गैरप्रकारांना बसणार चाप

सुनील पाटील
जळगाव : निवडणूक काळात विक्री होणाऱ्या दारुची माहिती आता अँड्रॉईड मोबाईल व संगणकाच्या एका क्लिकवर दिसणार आहे. निवडणूक काळातील दारुवर वॉच ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक एस.एल.आढाव यांनी ‘एक्साईज स्टॉक मॅनेजमेंट सिस्टीम्स’ नावाचे नवीन अ‍ॅप नुकतेच कार्यान्वित केले. नियमित साठ्यापेक्षा जास्त विक्री झाल्याचे या अ‍ॅपवर बसल्या जागी समजणार असून अशा दारु विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे.
निवडणूक काळात मतदार व कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारुचा वापर होतो. निवडणूक काळात मतदार असो की पक्षाचे कार्यकर्ते यांना आमिष दाखविणे हा गुन्हा आहे. जळगाव शहरात महापालिकेची निवडणूक सुरु असल्याने दारुवर वॉच ठेवण्यासाठी आढाव यांनी ‘एक्साईज स्टॉक मॅनेजमेंट सिस्टीम्स’ हे अ‍ॅप तयार केले.
नेमके काय आहे अ‍ॅप
या अ‍ॅपच्या माध्यमातून विदेशी, देशी, बियर व वाईन या मद्याचा प्रारंभीचा साठा, खरेदी, विक्री व शिल्लक साठा याची माहिती परवानाधारकांना दररोज दुपारी बारा वाजेच्या आत या अ‍ॅपद्वारे आॅनलाईन भरावी लागणार आहे. परवानाधारक व्यक्ती ही माहिती कुठूनही आपल्या मोबाईलवरुन भरु शकतो.
कोणी माहिती भरली, कोणी माहिती भरली नाही व अपूर्ण माहिती ही रोज अधीक्षकांना कळणार आहे. त्यामुळे मागील तारखेचा दारु साठा, आजच्या तारखेचा दारु साठा, विक्री याची माहिती मिळणार आहे.

Web Title: One click will get information about the use of alcohol in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.